
खोपोली : लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी घरातच रहावे, यासाठी प्रशासनाकडून जोर दिला जात आहे; मात्र त्यांच्या आदेशाचे पालन करणाऱ्या नागरिकांना घरपोच जीवनावश्यक सेवा देण्याबाबत सरकारी यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
खोपोलीतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू , भाजीपाला, किराणा साहित्य आदी सेवा घरपोच उपलब्ध करुन देण्यासाठी नगरपालिकेकडून मोबाईल अॅप निर्मिती करण्यात आली. पालिकेने मोठा गाजावाजा करून याअॅपचा प्रचार केला. नागरिकांना अॅपवरुन साहित्य खरेदी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन या अॅपवरुन ऑनलाइन ऑर्डर दिल्या; मात्र एक आठवडा उलटला तरीही या माध्यमातून सामान येत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
घरपोच सेवा अॅप सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून त्यात अनेक त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले. अॅप कार्यान्वित होऊन एक आठवडा उलटला तरी, यातील त्रुटी दूर करण्यात नगरपालिका प्रशासनास व संबंधीत अधिकाऱ्यांना यश आले नाही. त्यामुळे पालिकेचा घरपोच सेवा देणारे अॅप बिनकामी असल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने घराबाहेर पडावे लागत आहे.
तांत्रिक उणिवा दूर करणार
याबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असतां अॅपमधील काही तांत्रिक उणिवा दूर करण्यासाठी नगरपालिकेचे आयटी विभाग काम करीत असल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात आले.
The fuss of the municipality's home delivery service Annoyance to the citizens of Khopoli; error in the app
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.