
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या कॅप-१ फेरीच्या पहिल्या गुणवत्ता यादीचा काही दिवसांपासून सुरू असलेल्या घोळावर आज विभागाकडून पांघरुन टाकत ती ३० जून ऐवजी दोन दिवस अगोदर आज २८ जून रोजी जाहीर केली. या यादीत राज्यभरातून अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज केलेल्या १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांपैकी अर्ध्याच म्हणजे केवळ ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थी विविध महाविद्यालये अलॉट झाली आहे. यापैकी ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाली आहेत. तर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपेकी तब्बल अर्ध्याहून अधिक अशा ६ लाख ३९ हजार १०१ विद्यार्थ्यांना एकही महाविद्यालय अलॉट झाले नाही.