लग्नाच्या भूलथापा देत महिलांना गंडा घालणारा भामटा गजाआड; बोरिवली पोलिसांची कारवाई

राजू(अंधेरी बातमीदार)
Saturday, 5 September 2020

लग्न जमवणाऱ्या एका संकेतस्थळावरून ओळख झालेल्या तरुणीची फसवणूक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे.

अंधेरी : लग्न जमवणाऱ्या एका संकेतस्थळावरून ओळख झालेल्या तरुणीची फसवणूक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच बोरिवली पोलिसांनी अभिराज मोहिते-पाटील ऊर्फ अभिजित गजानन महेंद्रे याला अटक केली. स्थानिक न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी ठोठावली आहे. 

ब्रेकिंग! रिया चक्रवतीचा भाऊ शौविक आणि मिरांडाला एनसीबीडून अटक

अभिराज याने यापूर्वीही पुणे आणि नाशिकमध्ये लग्नाच्या भूलथापा मारत अनेक महिलांकडून लाखो रुपये उकळले होते. बोरिवली परिसरात राहणारी संबंधित तरुणी खासगी कंपनीत कामाला होती. तिने एका संकेतस्थळावर लग्नासाठी आपली माहिती अपलोड केली होती. अभिराजने तिच्याशी संपर्क साधून तिचा विश्‍वास संपादन करीत तिला लुटले. त्यांच्या लग्नाची तारीखही निश्‍चित झाली होती. दागिने आणि रोख असा सहा लाखांचा ऐवज तिने त्यांना दिला होता. अभिराज लग्नाची तारीख पुढे ढकलत होता. काही वेळा त्याने तरुणीला शिवीगाळ आणि मारहाणही केली होती. तिने बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर अभिराजला ताब्यात घेण्यात आले. 

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार परीक्षा; उदय सामंताची महत्वपूर्ण माहिती, वाचा सविस्तर

अशा प्रकारे कुणा तरुणीची फसवणूक झाली असल्यास त्यांनी बोरिवली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

-----------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gamata, a vagrant who puts women under the guise of marriage; Borivali police action