esakal | गणेशोत्सवात जुगार खेळणारे हिटलिस्टवर; या जिल्ह्यात आठ जण ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवात जुगार खेळणारे हिटलिस्टवर; या जिल्ह्यात आठ जण ताब्यात

गणेशोत्सवात काही समाजकंटक आर्थिक फायद्यासाठी बेकायदा जुगार आणि दारूचे अड्डे चालवतात. या प्रकारामुळे उत्सवाला गालबोट लागण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली खबऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीर व्यवसायांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

गणेशोत्सवात जुगार खेळणारे हिटलिस्टवर; या जिल्ह्यात आठ जण ताब्यात

sakal_logo
By
प्रमाेद जाधव

अलिबाग  : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रायगड पोलिसांनी जुगार आणि दारूच्या बेकायदा अड्ड्यांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार 
जिल्ह्यातील अलिबाग, रेवदंडा, रोहा, माणगाव, नेरळ या पाच पोलिस ठाण्यांनी गावठी दारूची वाहतूक आणि जुगार खेळणाऱ्या आठ जणांविरोधात कारवाई केली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

धक्कादायक : डहाणू, तलासरीत भूकंप

गणेशोत्सवात काही समाजकंटक आर्थिक फायद्यासाठी बेकायदा जुगार आणि दारूचे अड्डे चालवतात. या प्रकारामुळे उत्सवाला गालबोट लागण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली खबऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीर व्यवसायांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार माहिती घेऊन जुगार आणि बेकायदा दारू विक्री- वाहतूक करणाऱ्यांवर 20 ते 22 ऑगस्ट या कालावधीत कारवाई करण्यात आली. यामध्ये माणगाव येथील विळे आदिवासीवाडी येथे माणगाव पोलिसांनी छापा टाकून गावठी दारू जप्त केली. रोहा पोलिसांनी वांदोली आदिवासीवाडी व खैरवाडी या दोन ठिकाणी छापा टाकून सुमारे 45 लिटरची गावठी दारू जप्त केली आहे. 

अरे बापरे : ट्रॉम्बे परिसरात रस्त्याला मोठे भगदाड

रेवदंडा पोलिसांनी सुपेगाव फाटा जवळील तळेखार येथे छापा टाकून दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. अलिबाग शहरातील पीएनपी नगर येथील रिक्षा स्थानकाजवळील पत्र्याशेडमध्ये, तसेच थळ येथील आठवडा बाजार येथील पत्र्याच्या शेडमध्ये अलिबाग पोलिसांनी छापा टाकून मटका चालविणाऱ्यांविरोधात कारवाई केली. नेरळ येथील बाजार पेठेत मोबाईलवर मटका जुगार चालविणाऱ्यांवर नेरळ पोलिसांनी छापा टाकला. दारूची वाहतूक व साठा करणारे चार जण व मटका जुगाराचा अड्डा चालविणारे चार जण अशा एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

loading image