Ganesh Naik
esakal
नवी मुंबई : एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने १६ ऑक्टोबरपासून राज्यातील शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, नवी मुंबईतही उद्यापासून पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. मात्र नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा मिळणार अशी घोषणा गणेश नाईक यांनी केली आहे.