Ganesh Naik
esakal
तुर्भे : नवी मुंबईकरांवर आगामी २० वर्षे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत कोणतीही वाढ लादली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा देतानाच महापालिका कामगारांचे कल्याण आणि शहराचा विकास यांना समान प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.