पु. ल. देशपांडे अकादमीचे कलादालन तोट्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

आरक्षणाला अल्प प्रतिसाद; 2019मध्ये केवळ 14 प्रदर्शने

पु. ल. देशपांडे अकादमीचे कलादालन तोट्यात

मुंबई : प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कलादालनाला मिळणारा प्रतिसाद अत्यल्पच आहे. प्रभादेवीसारख्या मोक्‍याच्या ठिकाणी असूनही या प्रशस्त कलादालनाचे बुकिंग होत नाही. त्यामुळे अकादमीला तोटा सहन करावा लागतो. मागील वर्षी कलादालनात केवळ 14 खासगी प्रदर्शने झाल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.

सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच शरद पवार राज ठाकरेंबद्दल म्हणालेत...

प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे कला अकादमीतील रवींद्र नाट्य मंदिर, प्रदर्शन सभागृह, मिनी थिएटर यांचे अनेक महिन्यांचे आरक्षण झालेले असते. कलादालनाला मात्र बुकिंग मिळत नाही; महिन्याला केवळ दोन ते तीन प्रदर्शने होतात. मागील वर्षी काही महिने कलादालनाचे बुकिंगच झाले नव्हते, असे माहिती अधिकार अर्जाच्या उत्तरातून उघड झाले.

'शेठ' आले क्रिकेटच्या मैदानात आणि चालवल्याना चार गोळ्या...

मुंबईतील इतर कलादालने प्रदर्शनाच्या किमान तीन महिने ते वर्षभर आधी आरक्षित केली जातात. वरळी येथील नेहरू आर्ट गॅलरी, काळा घोडा येथील जहांगीर कलादालन, अंधेरी येथील आर्ट गॅलरी या ठिकाणी सतत प्रदर्शने सुरू असतात. दादर आणि प्रभादेवी ही रेल्वेस्थानके व रस्त्यांनीही प्रभादेवीला पोहोचणे सोपे आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमीत नेहमीच कार्यक्रम होत असल्याने रसिकांचा राबता असतो; मात्र कलादालन आरक्षित होत नाही.

दोन महिन्यांपूर्वीच त्या कुटुंबानं सगळं संपवलं होतं, घरमालक भाडं घ्यायला आले तेंव्हा सगळं समजलं...

याबाबत काही कलाकारांशी संवाद साधला. कलादालनाची जागा मोक्‍याची आहे; परंतु चित्र व शिल्पांच्या प्रदर्शनासाठी आवश्‍यक प्रकाशयोजनेत त्रुटी आहेत. चित्रे प्रदर्शित करण्यासाठी हुकची रचना व्यवस्थित नाही, असे त्यांनी सांगितले. या त्रुटींमुळे अन्य कलादालनांच्या तुलनेत येथील चित्रांची मांडणी आकर्षक वाटत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

९० रुपयात विकला जाणाऱ्या मृत्यूला आहे तिथे गाडा...

उत्पन्नात घट 
पु. ल. देशपांडे कला अकादमीतील कलादालन 2017 मध्ये 45 दिवस आरक्षित होते. त्यानंतर 2018 मध्ये 66 दिवस आणि 2019 मध्ये तर केवळ 41 दिवस आरक्षित होते. मागील वर्षी जून व जुलै महिन्यांत एकही आरक्षण झाले नाही. कलादालनातून 2019 मध्ये त्याआधीच्या दोन वर्षांपेक्षा कमी उत्पन्न मिळाले. कलादालनाचे भाडे दिवसाला 6500 रुपये असून, त्यावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जातो.

म्हणाली बाजारातून कपडे खरेदी करून येते आणि सासऱ्यांच्या शेतातील झोपडीत...

कलादालनाचे वार्षिक उत्पन्न 
2017 : 2,92,500 रुपये 
2018 : 4,29,000 रुपये 
2019 : 2,66,500 रुपये 

पु. ल. देशपांडे कला अकादमीतील कलादालनाचे आरक्षण होत नाही; त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. म्हणून आम्ही कलादालनाचा अभ्यास केला. येथील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडे चार लाख रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला आहे. 
- बिभीषण चवरे,
प्रभारी संचालक, पु. ल. देशपांडे कला अकादमी 

Pu La Deshpande Academy's art gallery in loss