एलबीएस मार्ग, दहिसर नदी घेणार मोकळा श्‍वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

महापालिकेकडून अतिक्रमणांवर कारवाई सुरू

एलबीएस मार्ग, दहिसर नदी घेणार मोकळा श्‍वास

मुंबई : अतिक्रमणांनी वेढलेले मुंबईतील रस्ते आणि नद्या आता मोकळा श्‍वास घेणार आहेत. विकासात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेने कठोर कारवाई सुरू केली असून, दहिसर नदी आणि पूर्व उपनगरातील महत्त्वाच्या एलबीएस रोडच्या रुंदीकरणाला आता वेग येणार आहे.

धक्कादायक 'शेठ' आले क्रिकेटच्या मैदानात आणि चालवल्याना चार गोळ्या...

मुंबईतील नद्या अतिक्रमणांमुळे नाले झाल्या आहेत. 26 जुलै 2005 रोजी आलेल्या महापुरानंतर मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर आता दहिसर नदीचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. पश्‍चिम उपनगरातील दहिसर नदीच्या किनारी झालेली 256 बांधकामे हटवण्यात आली आहेत. पूर्व उपनगरातील एलबीएस मार्ग अनेक वर्षांपासूनच्या अतिक्रमणांमुळे चिंचोळा झाला होता. या रस्त्यावरील अनेक अतिक्रमणांची प्रकरणे न्यायप्रविष्ट होती; त्यामुळे रुंदीकरण रखडले होते. 

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षावर हाय व्होल्टेज मिटिंग, मुद्दे आहेत...

आता मुंबईतील रस्ते आणि नद्यांलगतच्या अतिक्रमणांना प्रतिबंध करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, कठोर कारवाई सुरू केली आहे. दहिसर नदीच्या किनाऱ्यावरील अतिक्रमणांवर नुकतीच कारवाई करण्यात आली. तेथील 256 पैकी 206 बांधकामे महापालिकेच्या पथकाने हटवली. विशेष म्हणजे सुमारे 50 बांधकामे संबंधित नागरिकांनीच हटवल्याची माहिती दहिसर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली. 

घरच्या घरी `ब्लड शुगर` कंट्रोेल करण्याचे सोपे पर्याय...

पूर्व उपनगरातील लालबहादूर शास्त्री मार्गालगतच्या अतिक्रमणांवर सलग तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 45 बांधकामे हटवण्यात आली. या दोन्ही मोहिमांत विविध प्रकारची तब्बल 301 अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. विश्‍वास शंकरवार आणि देवेंद्रकुमार जैन या महापालिका उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. 

`गंगूबाई काठियावाडी` वास्तवापेक्षा वेगळाच? कोण म्हणतंय असं...

पुरापासून मिळणार दिलासा 
दहिसरच्या पूर्व व पश्‍चिम भागांतून दहिसर नदी वाहते. पावसाळ्यात नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्यास या भागांत पूरस्थिती निर्माण होऊन परिसरातील नागरिकांचे हाल होतात. या समस्येवर उपाययोजना म्हणून दहिसर नदीच्या काठावर 2065 फुटांची भिंत बांधण्याचे नियोजन आहे. त्यापैकी 1045 फुटांची भिंत बांधण्यात आली आहे. उर्वरित 1020 फुटांची भिंत बांधण्याचा मार्ग 235 बांधकामांवरील कारवाईनंतर मोकळा झाला आहे.

Municipal Corporation begins action on encroachment near Dahisar river