Thane News: शिंदेंचे टेंशन वाढले, नाईक समर्थक करणार नाहीत म्हस्केंचा प्रचार

Thane News: शिंदेंचे टेंशन वाढले, नाईक समर्थक करणार नाहीत म्हस्केंचा प्रचार

Navi Mumbai: नवी मुंबईत नरेश म्हस्के यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका आमदार गणेश नाईक यांच्या समर्थकांनी पुन्हा व्यक्त केली आहे. जोपर्यंत पक्षश्रेष्ठी भेट देत नाहीत, तोपर्यंत असहकार सुरुच असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र इथापे आणि महासचिव सूरज पाटील यांनी सांगितले. तर जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी मात्र कार्यकर्त्यांसोबत संवाद सुरु असून नाराजी लवकरच दूर होईल, असे स्पष्टीकरण दिले आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघाची उमेदवारी शिवसेनेचे शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना गेल्याने निर्माण झालेला वाद अद्याप क्षमलेला नाही. गुरुवारी कार्यकर्त्यांनी गणेश नाईक यांच्या क्रिस्टर हाऊसवर जाऊन राजीनामे दिले होते.

Thane News: शिंदेंचे टेंशन वाढले, नाईक समर्थक करणार नाहीत म्हस्केंचा प्रचार
Thane Crime News: भिवंडीत गोवंश मांसाची वाहतूक; पोलिसांनी केली मोठी कारवाई!

तसेच ठाणे लोकसभेवर संजीव नाईक यांच्या उमेदवारीसाठी आक्रमक झाले होते. यावेळी जोपर्यंत म्हस्के यांची उमेदवारी रद्द करून नाईकांना उमेदवारी देत नाही, तोपर्यंत प्रचार करणार नाही, अशी भूमिका नाईक समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.

मात्र, नाईक यांनी स्वतः नरेश म्हस्के यांचा प्रचार करणार असून नवी मुंबईतील कार्यकर्त्यांची समजूत काढू, असे स्पष्टीकरण गणेश नाईक यांनी दिल्याने म्हस्केंना असलेला विरोध मावळल्याचा चर्चा सुरू झाली आहे.

परंतु, भाजपचे नवी मुंबईतील उपजिल्हाध्यक्ष रवींद्र इथापे यांनी थेट चंद्रशेखर बावनकुळे अथवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद करण्याची मागणी केली आहे. तसेत तोपर्यंत प्रचार करणार नाही, असे भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीमधील भाजपसारख्या महत्त्वाच्या घटक पक्षातच दोन मतप्रवाह असल्याने ठाणे लोकसभा मतदार संघातील म्हस्के यांची जागा अडचणीत आली आहे.

Thane News: शिंदेंचे टेंशन वाढले, नाईक समर्थक करणार नाहीत म्हस्केंचा प्रचार
Thane News : ...अखेर तो कट खुला

ठाणे लोकसभेची जागा ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्यामुळे आगामी विधानसभेला नवी मुंबईत ज्या अडचणी येणार आहेत, त्या आम्हाला पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालायच्या आहेत. त्यावर त्यांना कोणती भूमिका घ्यायची हा त्यांचा निर्णय आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्ही वाट पाहत आहोत. या तिकिटानंतर दादागिरी आणि मक्तेदारी आपल्याला चालणार नाही.

- रवींद्र इथापे, उपजिल्हाध्यक्ष, भाजप नवी मुंबई.

---------------------------------------------

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्व भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कटिबद्ध आहोत. माजी महापौर सागर नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार गणेश नाईक नरेश म्हस्के यांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही सर्व गेलो होतो. गणेश नाईक यांनी त्यांची भूमिका याआधीच जाहीर केली आहे. आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सुसंवाद सुरु आहे.

- संदीप नाईक, जिल्हाध्यक्ष, भाजप, नवी मुंबई

Thane News: शिंदेंचे टेंशन वाढले, नाईक समर्थक करणार नाहीत म्हस्केंचा प्रचार
Thane News: दवाखान्यात पत्नी अचानक पडली आजारी, संतापलेल्या पतीने घेतला डॉक्टरांना चावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com