गणेश उत्सव २०२० : 'हा' बाप्पा दरवर्षी मुंबई ते काश्मीर करतो प्रवास, यंदाही परंपरा अखंडित...

गणेश उत्सव २०२० : 'हा' बाप्पा दरवर्षी मुंबई ते काश्मीर करतो प्रवास, यंदाही परंपरा अखंडित...

मुंबई / घाटकोपर: बॉर्डरवरील भारतीय सैनिकांना गणेशोत्सव साजरा करता यावा म्हणून मानवाधिकार कार्यकर्त्या किरण बाळा इशर आणि शिवनेर सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक छत्रपती आवटे यांच्यातर्फे भारत पाकिस्तान सीमेवर असलेल्या काश्मीर खोऱ्यातील पुंछ गावात अकरा वर्षांपासून मुंबईहून गणेशमूर्ती पाठवली जाते. गतवर्षी 2019 मध्ये काश्मीर मधील 370 आणि 35 ( ए ) कलम रद्द केल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तिथे मोठी सुरक्षा पुरवण्यात आली होती. अनिश्चिततेच्या वातावरणामुळे बॉर्डरच्या राजाच्या प्रवासात अडथळे आले होते.

भारतीय लष्कराच्या बॉर्डरचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जम्मू काश्मीर मधील पुंछ गावातील सैनिकांच्या श्री गणपतीचे पाद्यपूजन नुकतेच 1 ऑगस्ट रोजी कुर्ल्यातील श्री सिद्धिविनायक चित्रशाळेत पार पडले आणि मुंबईच्या बांद्रा टर्मिनस येथून स्पेशल ट्रेनने दोन हजार किलो मीटर प्रवास करत गणेशमूर्ती जम्मू काश्मीरला आज दाखल झाली. यावर्षी आर्मी ब्रिगेडमध्ये मराठा रेजिमेंट सोबत हा उत्सव साजरा करणार असल्याचे मानवाधिकार कार्यकर्त्या किरण बाळा इशर यांनी माहिती देताना सांगितले.

जम्मू काश्मीरमधील पुंछ गाव नेहमी अतिरेक्यांच्या आणि पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईमुळे दहशतीखाली आहे. भारतीय सैनिक रात्रं दिवस गावातील सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत मायभूमीचे रक्षण करत असतात. जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांना वर्षभर कोणताच उत्सव साजरा करता येत नाही. पुंछ गावच्या असणाऱ्या किरण बाळा इशर व शिवनेर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक छत्रपती आवटे 11 वर्षांपासून भारतीय सैनिकांसाठी 10 दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. यंदा शासनाच्या नियमामुळे बॉर्डरच्या राजाची दीड फूट गणेशमूर्ती मुंबईतून पुंछ गावाला नेण्यात आली आहे. जागतिक कोरोना महामारीमुळे यंदा बॉर्डरचा राजा गणेशोत्सवाच्या 15 दिवस आधीच रवाना झाला आहे. तिथल्या सरकारच्या नियमाप्रमाणे आयोजकांना  आधी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. 

तिरंगा फडकावत बॉर्डरच्या राजाचे सैनिकांकडून होते स्वागत

दरवर्षी मुंबईतून जम्मू काश्मीरच्या पुंछ गावात रवाना होणाऱ्या बॉर्डरच्या राजाचे भारतीय लष्कराकडून तिरंगा फडकावत, गुलाल उधळत जंगी स्वागत करण्यात येते. यंदा लष्कराच्या परवानगी नुसार आणि दिलेल्या नियमानुसार सैनिक सामाजिक अंतर ठेवत आणि अत्यंत शांततेने तिरंगा फडकावत गणेशमूर्तीचे स्वागत करण्यात आल्याचे मानवाधिकार कार्यकर्त्या किरण बाळा इशर यांनी सांगितले. 

दरवर्षीची प्रथा

बॉर्डरच्या राजाची मूर्ती श्री सिद्धिविनायक चित्रशाळेतील मूर्तिकार विक्रांत पांढरे साकारत आहेत. दरवर्षी आम्ही बाप्पाचे भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत "भारत माता की जय, वंदे मातरम  या घोषणा देत गणेश स्तोत्र मंत्राद्वारे पाद्यपुजन करतो असे शिवनेर सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक छत्रपती आवटे यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल ) 

ganesh utsav 2020 border cha raja ganesh idol reached kashmir from mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com