Toll-Free Routes and Pass Details for Ganeshotsav
esakal
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणातील मूळ गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून (टोल) सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याचबरोबर प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागानं परिपत्रक जारी केलं आहे.