
ठाणे : गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण शहराला राजकीय बॅनरबाजीचा विळखा बसला असताना यातून ठाणे महापालिका मुख्यालयही अपवाद राहिलेले नाही. गेल्या ४३ वर्षांपासून पालिका कर्मचार्यांमार्फत मुख्यालयात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मात्र यावर्षी पहिल्यांदाच मुख्यालयाच्या दर्शनी भागात लावलेल्या बॅनरने पालिकेच्या गणेशोत्सवावर महायुतीची छाप पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.