वाघाची कातडी विकणारी टोळी वनविभागाच्या जाळ्यात ; कातड्यासह 7आरोपी ताब्यात

गुप्त बातमीद्वारे ग्राहक बनून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घतले
gang selling tiger skin arrested by forest department
gang selling tiger skin arrested by forest department sakal

बिबट्याची कातडी विकणारी टोळी शहापूर तालुक्यात ग्राहकाच्या शोधात असल्याची गुप्त माहिती खर्डी च्या वनाधिकाऱ्यांना मिळाल्यावर,तालुक्यातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून सापळा रचून 7 आरोपी,4 मोटरसायकल व बिबट्याच्या कातड्यासह घोटीजवळील सिन्नर फाट्याजवळ ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी आणखी आरोपी मिळण्याची शक्यता असून बिबटया कुठे मारला का?त्याची नखे कुठे आहेत?असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून नेमका हा बिबट्या कुठला याचा तपास करणे वनविभागाला जिकरीचे ठरणार आहे.

gang selling tiger skin arrested by forest department
चित्तथरारक! गोव्याला जाणारी चालती आरामबस पेटली

याप्रकरणी बिबट्याच्या शहापूर तालुक्यातील खर्डीच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वनपरिक्षेत्र वाशाळामधील मौजे वाशाळा गावाचे परिसरात वन्यप्राणी कातडयाचा व्यापार होण्याची गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाल्यावर ,गेल्या 15 दिवसापासून त्या टोळीशी नकली ग्राहक बनून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व वन्यजीव प्राणी मित्राने वाघाचे कातडे विकत घेण्यासाठी आरोपीशी व्हाट्सएपद्वारे चर्चा करून व्यवहार करण्याचे ठरले होते.

2 फेब्रु रोजी संध्याकाळी 5 च्या दरम्यान घोटी जवळील सिन्नर फाट्याजवळ व्यवहार करण्याचे ठरल्यावर ,वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खर्डी, शहापूर व वाशाळा येथील सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून घोटीजवळ सापळा रचून 7 आरोपीसह 4 मोटारसायकल सहित वाघाचे कातडे ताब्यात घेतले आहे.

gang selling tiger skin arrested by forest department
‘पीएनजी’मध्ये ‘डायमंड फेब धमाका’ ; घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सवलत

शहापूर वसंत घुले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक अमोल जाधव,खर्डीचे वनाधिकारी प्रशांत देशमुख, विशाल गोदडे,प्रकाश चौधरी आणि त्यांचे कर्मचाऱ्यांनी संयुक्त सापळा रचून बनावट ग्राहक बनून बिबट्याच्या कातड्याचा व्यवहार करताना मुद्देमालासह रंगेहात आरोपींना पकडण्यात यश आले.

वनक्षेत्रपाल प्रकाश चौधरी व वन्यजीव प्राणीमित्र संतोष जगदाळे हे बनावट ग्राहक बनून व्यवहार करण्यासाठी आरोपींसोबत चर्चा करीत होते.याप्रकरणी काळु सोमा भगत( इगतपुरी),रघुनाथ शंकर सातपूते(मोखाडा) मुकुंदा सोमा सराई (त्र्यंबकेश्वर ),अशोक सोमा मेंगाळ (इगतपुरी) योगेश लक्ष्मण अंदाडे( इगतपुरी),गोटीराम गवारी(त्र्यंबकेश्वर)व अर्जुन गोमा पानेडा शहापूर( शिरोळ ) यांना अटक करण्यात आली असून आरोपीं वर वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम 09,44,48 ( ए ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे . त्यानुसार पुढील तपास चालू आहे . या कारवाईत खर्डी वनपाल एन . एस . श्रावणे,व्हि.एस गायकवाड, एस . बी . गाठे, वाय . पी . पाटील, पी . डी . बेलदार, जी. एस.भोये,एस.एल.शिदे,बी.पी. वसावे व एस.एस. अहिरे यांनी महत्वाची कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com