esakal | आरटीपीसीआर चाचणी रद्द झालीच पाहिजे; उद्या रेल्वे रोको आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

konkan

आरटीपीसीआर चाचणी रद्द झालीच पाहिजे; उद्या रेल्वे रोको आंदोलन

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त (Ganpati Festival) कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना (Konkan commuters) मागील तीन महिन्यांपासून रेल्वे, एसटीचे (reservation) आरक्षण केले होते. त्यानंतर गणेशोत्सवाला काही दिवस बाकी असताना चाकरमान्यांना प्रशासनाकडून नवीन नियमावली (new rules) जाहिर केली जाते. यात कोरोना लसीचे दोन डोस न घेतलेल्यांना आरटीपीसीआर (RTPCR) निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. या प्रशासनाच्या नियमावलीचा चाकरमान्यांनी निषेध केला आहे. आरटीपीसीआर चाचणी रद्द झालीच पाहिजे, अशी मागणी कोकणवासियांकडून केली जात आहे. परिणामी, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने नवीन नियमावली रद्द करून कोकणात प्रवेश देण्यात यावा. यासाठी 6 सप्टेंबर रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्याची भूमिका संघटनेच्यावतीने मांडली आहे.

हेही वाचा: प्रॉव्हीडंट फंडावरील जिझिया; श्रीमंतांनाच फटका बसणार

मागील वर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणात चाकरमान्यांना जाता आले नाही. त्यामुळे यंदा कोकणात जाण्यासाठी लगबगीने चाकरमान्यांनी तयारी केली होती. त्यासाठी तीन महिन्याच्या अगोदर रेल्वे, एसटीचे तिकिट काढले होते. मात्र, गणेशोत्सव तोंडावर असताना राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्यांसाठी नवीन नियम घातले आहे.

सरकारने रेल्वे, एसटीचे आरक्षण करण्याच्यावेळी कोकणात जाणाऱ्यांसाठी नियम घालणे आवश्यक होते. आता अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असताना नवीन नियम घातल्याने सर्वसामान्य चाकरमान्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी रद्द झालीच पाहिजे. यासाठी 6 सप्टेंबरला रेल्वे रोको आंदोलन करणार आहोत, असे कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी सांगितले.

हेही वाचा: महामंडळाच्या आर्थिक डबघाईला राज्य सरकार जबाबदार; कामगार युनियनचा आरोप

कोकणवासियांसाठी गणेशोत्सव जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे कोणत्याही संकटात, कोणत्याही परिस्थितीत मुंबई, पुण्यातील चाकरमानी कोकणात गणेशोत्सवाला जातो. मागील वर्षीसारखीच यंदाही प्रशासनाकडून कोरोनाचे कारण समोर करून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याकरिता नव्या नियम आणि शर्थी घातल्या. प्रशासनाचा या निर्णयाचा विरोध आहे. सध्या राज्यात राजकीय कार्यक्रम होत आहे.

त्यांच्या सभा आणि मेळाव्याना प्रशासनाकडून अनुमती दिली जाते. मात्र, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याकरिता नियमांचे विघ्न घातले आहे. हे चुकीचे असून प्रशासनाने तत्काळ गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांवर लादलेले नियम आणि अटी रद्द कराव्यात, अशी मागणी कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी केली.

loading image
go to top