Noise Pollution : गणेश विसर्जन आणि ईद मध्ये झाले ध्वनी प्रदूषण

गणेश विसर्जनात 114 डीबी तर ईदमध्ये 108 डीबीची नोंद
Noise Pollution : गणेश विसर्जन आणि ईद मध्ये झाले ध्वनी प्रदूषण
sakal

मुंबई - यंदाही गणपती विसर्जनाच्या वेळी ढोल-ताशे आणि डीजेमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ झाली, तर आश्चर्याची बाब म्हणजे ईदच्या वेळी हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किंचित कमी ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली आहे.

गणेश विसर्जनाच्या वेळी 114 डेसीबल तर ईदच्या वेळी 108 डीबी ध्वनी रेकॉर्ड करण्यात आला. तर गतवर्षी विसर्जनाच्या वेळी १२० डीबी तर ईदच्या वेळी ११६.३ डीबी आवाजाची नोंद झाली होती. मात्र, यावेळी डीजेची संख्या खूपच कमी होती. मुंबईत गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या उत्सवात गुलाल, फटाक्यांची आतषबाजी याशिवाय ढोल, डीजेच्या तालावर लोक येऊन बाप्पाचे विसर्जन करतात.

यावेळी ध्वनिप्रदूषणाची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असते. यंदाही गणेश विसर्जनाच्या वेळी आवाजाची पातळी उच्च राहिली. आवाज फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाची पातळी नोंदवली.

आवाज फाऊंडेशनच्या अहवालानुसार, यावेळी गणपती विसर्जनाच्या 7 व्या दिवशी वरळी नाका येथील डीजेमधून सर्वाधिक 111.1 डीबी आवाजाची पातळी नोंदवण्यात आली. तर गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी माटुंग्यात सर्वाधिक ११४.७ डीबी आवाजाची नोंद झाली. शुक्रवारी साजऱ्या झालेल्या ईद-ए-मिलादच्या वेळीही आवाजाची पातळी खूप जास्त होती.

मोहम्मद अली रोड आणि क्रॉफर्ड मार्केट दरम्यान सर्वात जास्त 108.1 डीबी आवाजाची पातळी नोंदवली गेली. यामध्ये लाऊडस्पीकरसह वाहनांच्या हॉर्नच्या आवाजाने ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढली.

यावेळी डीजेचे प्रमाण कमी -

आवाज फाऊंडेशनच्या संस्थापक सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणपती आणि ईद या दोन्ही ठिकाणी डीजेची संख्या कमी होती. यावेळी गणपती विसर्जनाच्या वेळी राजकीय पक्षांनी उभारलेल्या व्यासपीठांवर मोठा गोंधळ झाला. 12 वाजल्यानंतरही गिरगाव चौपाटीवरील पार्टी स्टेजवरून विहित मर्यादेपेक्षा 114.1 डीबी एवढा आवाज नोंदवण्यात आला.

लोक नियमांकडे दुर्लक्ष करतात आणि लाऊडस्पीकर इत्यादी वापरून ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढवतात. पोलिस कारवाईसाठी असमर्थ ठरत आहेत. 

ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम लोकांच्या आरोग्यावर दिसून येतात. जास्त आवाजामुळे रक्तदाब वाढतो, हृदयरोग्यांच्या समस्या वाढतात आणि मानसिक आरोग्यालाही हानी पोहोचते. राजकीय पक्षांनी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी आणि पोलिसांना कारवाई करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे.

विसर्जनाचा शेवटचा दिवस -

आवाज 100 dB च्या पलीकडे असलेली ठिकाणे -

माटुंगा 114.7 dB 

SNDT कॉलेज 110.1 dB

वरळी 110.1 dB

SV रोड सांताक्रूझ 109 DB

जुहू तारा रोड 108.7 dB

कफ परेड 108.5 dB

ईद मध्ये आवाज -

जेजे फ्लायओव्हर ते क्रॉफर्ड मार्केट 93 dB ते 108.1 dB 

भायखळ्यात ९५.५ डीबी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com