गारगाई ते मोडकसगार जलबोगदा तयार करणार; BMCकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू

समीर सुर्वे
Sunday, 13 December 2020

गारगाई धरणा बरोबरच गारगाई ते मोडकसगार 2.5 किलोमिटर लांबीचा जलबोगदा तयार करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे

मुंबई : गारगाई धरणा बरोबरच गारगाई ते मोडकसगार 2.5 किलोमिटर लांबीचा जलबोगदा तयार करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. या धोरणा बरोबरच जलबोगद्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली आहे.त्यासाठी 16 कोटी 82 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. 

हिवाळी अधिवेशनाआधी भाजपचा चहापानावर बहिष्कार; महाविकास आघाडीवरही टीका

पालघर मध्ये महानगर पालिकेने गारगाई हे धरण बांधणार आहे.या धरणासाठी 3 हजार कोटीहून अधिक खर्च अपेक्षीत असून त्यातून रोज 440 दशलक्ष लिटर पाणी मुंबईला मिळणार आहे.या धरणातील पाणी थेट मुंबईला आणण्यासाठी नव्या जलवाहीन्या टाकाव्या लागल्या असत्या.मात्र,धरणातील पाणी मोडकसागर धरणात आणून ते मुंबईला पाठविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.त्यासाठी 2.5 किलोमिटर लांबीचा जलबोगदा बांधण्यात येणार आहे.धरण तसेच जलबोगदा उभारण्याच्या कामासाठी पालिकेने मागविलेल्या निवेदत स्मेक इंटरनॅशनल पिटीवाय ही ऑस्ट्रेलियन कंपनी पात्र ठरली आहे.या सल्लागार सेवेसाठी महानगर पालिका 16 कोटी 82 लाख रुपये शुल्क मोजणार आहे.तसा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे.हा सल्लागार धरणाची,बोगद्याची संकल्पंना तयार करणे,अंदाजपत्रक तयार करणे,परवानगीसाठी आवश्‍यक असलेल्या प्राधिकरणाशी समन्वय साधणे,कामांचे नियोजन करणे अशी कामे करायची आहेत. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हे धरण रोलर कॉम्पेक्‍टेड कॉक्रिंट (आरसीसी ) पध्दतीने बांधण्यात येणार आहे.अशा प्रकारची तीन धरण भारतात आहे.त्यात,अहमदनगर येथील घाटगर आणि मुंबई पालिकेचे शहापुर येथील मध्य वैतरणा धरणाचा समावेश आहे.या पध्दतीने पांरंपारीक पध्दती पेक्षा अधिक वेगाने धरणाचे बांधकाम पुर्ण होते.असा दावा पालिकेने केला आहे. 

धरणाचा परीणाम 
-पाण्याखाली जमिन - 840 हेक्‍टर 
- पाण्याखाली गावं -6 
-स्थालांतर होणारी कुटूंब - 435 

चिनी कंपनी बाहेर 
या सल्लगार सेवेसाठी एका भारतीय कंपनीसह चिनी कंपनीने निवीदा भरल्या होत्या.या चिनी कंपनीला धरण बनवण्याचा अनुभव आहे.मात्र,या कंपनीला धरणाच्या पर्यवेक्षणाचा अनुभव नसल्याने ही कंपनी अपात्र ठरली.

Gargai to Modaksagar will build water tunnel Procedure for appointment of consultant from BMC

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gargai to Modaksagar will build water tunnel Procedure for appointment of consultant from BMC