लालबाग सिलेंडर स्फोट: मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत

लालबाग सिलेंडर स्फोट: मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत

मुंबई: रविवारी लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलेंडर स्फोट दृर्घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले. 

सिलेंडरचा स्फोट झालेल्या दुर्घटनेत रविवारी उशिरा एकाच तर सोमवारी सकाळी दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मृतांमध्ये 62 वर्षीय सुशीला बंगेरा आणि 50 वर्षीय करीम यांची नावे सांगण्यात आली होती. या व्यतिरिक्त पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर तीन जण किरकोळ भाजले होते. दोन जणांना सोमवारी दुपारी घरी सोडण्यात आले होते. पाच जणांची प्रकृती स्थिर असल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाने सांगितले. तर मसीना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

तिघांना लवकरच डिस्चार्ज

त्यातील तिघांची प्रकृती सुधारत असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्या तिघांनाही कमी प्रमाणात भाजले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. 

5 जणांची प्रकृती चिंताजनक 

दरम्यान अचानक झालेल्या या घटनेमध्ये भाजणाऱ्यांचे प्रमाण 60 ते 70 टक्क्यांहून अधिक होते. त्यामुळे या आता 10 पैकी 5 जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. 

अशी घडली घटना

लालबागच्या गणेश गल्ली जवळ असणाऱ्या साराभाई या इमारतीत राहणारे मंगेश राणे यांच्या मुलीच्या लग्नाची लगीन घाई सुरू होती, रविवारी हळदी समारंभ होणार होता. मात्र सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लग्न घरातील गॅस सिलेंडरची गळती सुरू होऊन सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत एकूण 16 जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना केईएम आणि भायखळ्यातील मसीना रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे साराभाई इमारीतीतील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून इमारतीला ठिकठिकाणी भेगा गेला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.  दरम्यान, भायखळ्यातील मसीना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

जखमींची नावे 

प्रथमेश मुणगे (27)
रोशन अंधारी (40)
मंगेश राणे (61)
मंगेश मुणगे (56)
ज्ञानदेव सावंत (85)
विनायक शिंदे (75)
ओम शिंदे (20)
यश राणे (19)
मिहीर चव्हाण(20)
ममता मुनगे(48)

मृत व्यक्तींचे नावे

  1. करीम (50)
  2. सुशीला बागरे (62)

मसीना रुग्णलयात दाखल

वैशाली हिमांशु (44)
त्रिशा (13)
बिपीन (50)
सूर्यकांत (50)

----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Gas cylinder explosion south mumbai lalbaug Update two death CM Assistance Fund

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com