
Ghatkopar Car Accident Three Detained Driver Still Absconding
Esakal
घाटकोपरमध्ये एलबीएस मार्गावर शनिवारी सकाळी भरधाव कारने फूटपाथवरील काही जणांना धडक दिली. यात तिघे जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केलंय. तर पोलिसांनी दोन तरुणींसह तिघांना अटक केली आहे. भरधाव कार दुभाजकाला धडकल्यानंतर दुकानांवर जाऊन आदळली. त्यानंतर फूटपाथवर झोपलेल्या तिघांना चिरडलं.