Ghatkopar Hoarding Collapse Update: 'ते' १४ जणांचा जीव घेणारे होर्डिंग बेकायदेशीर; BMCने दिली माहिती

Ghatkopar Hoarding Collapse Update: मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७४ जण जखमी झाले आहेत.
Ghatkopar Hoarding Collapse Update
Ghatkopar Hoarding Collapse UpdateEsakal

मुंबईसह परिसरात काल मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. घाटकोपर हायवे पोलीस क्वार्टर पेट्रोल पंप येथील होल्डिंग पडल्यामुळे एकूण १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ७४ जण जखमी झाले आहेत. दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरुच आहे. या घटनेनेबाबत मोठी माहीती समोर आली आहे.

मुंबईतील घाटकोपर परिसरात पडलेले एक महाकाय होर्डिंग महापालिकेच्या परवानगीशिवाय बांधण्यात आले अशी माहिती आता समोर आली आहे. हे होर्डिंग सुमारे १७,०४० स्क्वेअर फूट मोजले गेले आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठे होर्डिंग म्हणून नमूद केले गेले, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एक निवेदन जारी करून हे जाहिरात फलक त्यांच्या परवानगीशिवाय बांधण्यात आल्याचे म्हटले आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, त्या ठिकाणी चार होर्डिंग्ज होत्या आणि त्या सर्वांना एसीपी (रेल्वे प्रशासन) यांनी मान्यता दिली होती.

Ghatkopar Hoarding Collapse Update
"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

"होर्डिंग्ज उभारण्यापूर्वी बीएमसीची कोणतीही परवानगी/एनओसी एजन्सी/रेल्वेकडून घेण्यात आली नाही/घेतली नाही," असे बीएमसीच्या निवेदनात म्हटले आहे.

बिलबोर्ड बांधणाऱ्या M/S Ego Media या एजन्सीविरुद्धही तक्रार नोंदवण्यात आली होती, त्यानंतर BMC ने FIR दाखल केली आहे. नागरी संस्थेने असेही नमूद केले आहे की, ते जास्तीत जास्त ४० x ४० चौरस फूट होर्डिंग्ज करण्यास परवानगी देते. मात्र, कोसळलेले होर्डिंग १२० x १२० चौरस फूट आकाराचे होते.

Ghatkopar Hoarding Collapse Update
घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ, 74 जखमींना वाचवण्यात यश

"बीएमसी (एन वॉर्डचे सहाय्यक आयुक्त) ने एजन्सीला बीएमसीची वैध परवानगी नसल्याबद्दल त्यांचे सर्व होर्डिंग तात्काळ काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे," असे निवेदनात म्हटले आहे.

नागरी मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बीएमसी आयुक्त भूषण गगराणी म्हणाले, "हे एक बेकायदेशीर होर्डिंग होते. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी रेल्वेच्या जमिनीवर चार होर्डिंग उभारण्यात आले होते आणि त्यापैकी एक कोसळले आहे. बीएमसी एक वर्षापासून होर्डिंग्ज लावण्यावर आक्षेप घेत होती."

ते पुढे म्हणाले की मुंबई नागरी संस्थेने १९ मे २०२३ रोजी संबंधित होर्डिंगची दृश्यमानता वाढवण्यासाठी छेडा नगर जंक्शनजवळील आठ झाडांना विषबाधा केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com