
ठाणे : शहरातील घोडबंदर रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरील उड्डाणपुलांसह रस्त्यावर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खड्डे पडले होते. ते खड्डे काही दिवसांपूर्वी मास्टिकच्या सहाय्याने बुजवले होते. त्यानंतर आता पुन्हा वाघबीळ उड्डाणपुलावर खड्डे तसेच पातलीपाडा पुलावरील रस्ता मास्टिकमुळे उंच-सखल झाला आहे. त्यामुळे दुचाकीसह चारचाकी व अवजड वाहनांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. या मार्गावर अपघाताची भीती वर्तविण्यात येत आहे.