गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी २ हजार ऑनलाइन नोंदणी, मात्र असेल 'ही' अट

गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी २ हजार ऑनलाइन नोंदणी, मात्र असेल 'ही' अट

मुंबईः यंदा गणपती विसर्जन करण्यासाठी समुद्रात उतरण्यात मनाई करण्यात येणार आहे. गिरगाव चौपटीवर गणेश विसर्जन करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात नोंदणी करत आहेत. दरम्यान भाविकांना समुद्रात मज्जाव करण्यात येणार असून समुद्रावर पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच गणेशमूर्तीचे चौपाटीवर विसर्जन करण्यात येईल. तसंच विसर्जनावेळी चौपाटीवर गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी घराच्या जवळ असलेल्या कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करा, अशी विनंतीही पालिकेकडून चौपाटीसाठी नोंदणी केलेल्या भाविकांना करण्यात येते आहे. 

गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दोन हजार गणपतींची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. दरवर्षी गणेशोत्सवात दीड, पाच, सात आणि दहाव्या दिवशी गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येनं भाविक विसर्जनासाठी येत असतात. यंदा कोरोनाचं संकट पाहता पार्श्वभूमीवर चौपटीवर गर्दी होऊ नये म्हणून पालिकेच्या डी विभाग कार्यालयाद्वारे एस. एम. जोशी क्रीडांगण, ऑगस्ट क्रांती मैदान, गिल्डर लेन वसाहत, बाणगंगा, बीआयटी चाळ मैदान (मुंबई सेंट्रल), बॉडीगार्ड लेन आरटीओ येथे कृत्रिम तलाव उभारण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त ट्रकवरही विसर्जनाची फिरती व्यवस्था करण्यात येणार असल्याचंही पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. 

गणेश विसर्जनासाठी भाविकांनी पालिकेच्या shreeganeshvisarjan.com  या वेबसाईटवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन हजार भाविकांनी नोंदणी केली आहे. बऱ्याच भाविकांनी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन करण्यासाठी नोंदणी केल्याचं समजतंय.  पालिकेनं भाविकांना कृत्रिम तलावाच्या आसपास राहणाऱ्यांना तिथेच विसर्जन करण्याची विनंतीही केली आहे. कुलाब्यापासून लालबाग, परळ, चेंबूर परिसरांतील गणपतींचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात येते.

चतुर्थीआधीच गणेशमूर्ती घरी आणा

कोरोना व्हायरसचा संकट पाहता गणेश आगमनानिमित्त होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. भाविकांनी गणेश चतुर्थीच्या तीन-चार दिवस आधीच कार्यशाळांमधून गणेशमूर्ती घरी आणावी. तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही ही बाब विचारात घेऊन गणेश आगमन करावं, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.

girgaon chowpatty two thousand online registration immersion

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com