स्वराज एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा गळफास; डहाणू रोड स्थानकात थांबवली गाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swaraj Express

स्वराज एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा गळफास; डहाणू रोड स्थानकात थांबवली गाडी

डहाणू : धावत्या रेल्वेमध्ये एका तरुणीनं गळफासाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. प्रवाशांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला कळवल्यानंतर डहाणू रोड स्थानकात ही रेल्वे थांबवण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Girl strangled in Swaraj Express train stopped at Dahanu road station)

एएनआयच्या ट्विटनुसार, दुपारी १२.३५ वाजताच्या दरम्यान पश्चिम रेल्वेकडे स्वराज एक्स्प्रेसबाबत एक महत्वाचा कॉल आला. त्यानंतर या गाडीला डहाणू रोड स्थानकात दुपारी १ वाजून १० मिनिटांनी विशेष थांबा देण्यात आला. या एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला हा कॉल केले होता, त्यांनी म्हटलं होतं की, "एक वीस वर्षीय मुलगी वॉशरुमला गेली होती, पण बराच वेळापासून ती परतलेली नाही"

दरम्यान, ही माहिती मिळताच मध्ये रेल्वेकडून स्वराज एक्स्प्रेस डहाणू रोड स्थानकात थांबवली. त्यानंतर रेल्वेच्या स्टाफनं ती तरुणी ज्या डब्यात होती त्या डब्याचं बंद असलेल्या वॉशरुमचं लॅच उघडलं. त्यानंतर संबंधीत तरुणी वॉशरुममध्ये पडलेली आढळली, तिच्या गळ्याला एक कपडा गुंडाळलेला होता. यानंतर तिला तातडीनं बाहेर काढत येथील डहाणू कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.