
नवी दिल्ली : बॉईज लॉकर रुम ग्रुपबद्दल पोलिसांनी कारवाई सुरु केली असतानाच मुलींचेही याच प्रकारचे ग्रुप असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरु झाली आहे. मुलींच्या या ग्रुपवरुन पुरुषांची आक्षेपार्ह छायाचित्र पोस्ट केली असल्याचा दावा केला जात आहे.
सामूहिक बलात्काराचे समर्थन करताना आपल्या वर्गातील मुलींबाबत आक्षेपार्ह टीप्पणी होत असल्यामुळे मुलांच्या बॉईज लॉकर ग्रुपवर टीका झाली. याबाबत एका मुलीने ट्वीटरवरुन आवाहन केल्यानंतर मुलांविरुद्धच्या कारवाईच्या मागणीने जोर धरला. या प्रकरणी दिल्लीतील एका प्रतिष्ठीत शाळेतील विद्यार्थ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले तसे त्याची चौकशी सुरु आहे.
दक्षिण दिल्लीतील प्रतिष्ठीत चार पाच शाळा महाविद्यालयातील हे विद्यार्थी आहेत. ते अकरावी बारावीत शिकत आहेत. त्यांचा हा ग्रुप पालकांची डोकेदुखी ठरला आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी इन्टाग्रामवरील ग्रुपबाबत माहीती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी याबाबत फेसबुकला पत्र पाठवले आहे. या ग्रुपचे शंभरहून जास्त सदस्य आहेत. त्यातील अनेकांनी टिप्पणी केलेली नाही. त्या ग्रुपवर अनेक मुलींचीही छायाचित्रे आहेत. आता हे प्रकरण गंभीर होत आहे. समाजमाध्यमांवर त्यांची दखल घेतली जात आहे. त्यामुळे बॉईजलॉकररुम हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
बॉईज लॉकर रुमचे मुलींचे व्हर्जनही असल्याचा आता दावा होत आहे. त्यात मुलांबद्दल आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी असते. त्या ग्रुपवरील स्क्रीनशॉटही आता समाजमाध्यमांवर शेअर होत आहेत. एवढेच नव्हे तर ही छायाचित्र पोस्ट केलेल्या एका व्यक्तीने हे केवळ मुलांकडूनच होत नाही तर मुलींकडूनही होते हे दाखवण्यासाठीच आपण हे शेअर करीत असल्याचे म्हंटले असल्याचे वृत्त आहे. मात्र याची खातरजमा झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.