esakal | एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 500 कोटी रुपये द्या; महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसची मागणी..
sakal

बोलून बातमी शोधा

st mahamandal

राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे 50 टक्के वेतन देऊन इतर 100 टक्के कपाती करण्यात आल्या आहे. तर जून महिन्याचे वेतन अद्यापपर्यंत मिळाले नाही.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 500 कोटी रुपये द्या; महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसची मागणी..

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे 50 टक्के वेतन देऊन इतर 100 टक्के कपाती करण्यात आल्या आहे. तर जून महिन्याचे वेतन अद्यापपर्यंत मिळाले नाही.

त्यामुळे कामगारांची उपासमार टाळण्यासाठी राज्य शासनाकडून आर्थीक सहाय्य करने गरजेचे आहे. यामध्ये मे,जुन च्या संपूर्ण वेतनासाठी तात्काळ 500 कोटी रूपयांची मदत देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड आणि सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.

हेही वाचा: लॉकडाऊनआधी वेतन न मिळणाऱ्या कामगारांना सरकारचा निर्णय गैरलागू:  हायकोर्टचा महत्वपूर्ण निर्णय

कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर राज्य आणि केंद्राने 23 मार्च पासून एसटीची बस सेवा बंद केली आहे. त्यामूळे महामंडळाचे दररोज 22 कोटी रुपयाचे उत्पन्न बुडत असून 2300 कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

तर संचित तोटा 6155 कोटी रूपये इतका आहे. एसटी कर्मचा-यांना महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी 249 कोटी रूपये लागत असले तरी, एसटीचे उत्पन्न बुडाल्याने मे महिन्याचे 50 टक्केच वेतन देण्यात आले आहे. त्यामूळे कर्मचाऱ्यांपुढे आर्थीक संकट निर्माण झाले आहे.

अशा परिस्थितीत देशातील गुजरात,कर्नाटक,आंध्रप्रदेश, तेलंगना, उत्तरप्रदेश, हिमाचल राज्य मार्ग परिवहन महामंडळांना एसटी कर्मचा-यांच्या वेतनाकरीता अर्थसहाय्य दिले आहे. त्यामूळे इतर राज्यांच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्याने सुद्धा एसटी महामंडळास अर्थसहाय्य देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.

हेही वाचा: मनसेनं गूगलला पत्र पाठवून केली 'ही' महत्वाची मागणी..वाचा सविस्तर बातमी  

या आहेत मागण्या:

- एसटी महामंडळास कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कर्मचा-यांच्या वेतनाकरीता 500 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात यावे.
- मे महिन्याचा उर्वरीत 50 टक्के वेतन तात्काळ देण्यात यावे.
- जुन महिन्याचे 100 टक्के वेतन तात्काळ द्यावे.
- एसटी महामंडळास आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर उपाय योजना द्या. 

give 500 crore for salary increase of ST employees