esakal | देशातील रेल्वेची नियमित वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद? सोशल मीडियावर जोरदार चर्चा...
sakal

बोलून बातमी शोधा

railway

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील रेल्वेची नियमित प्रवासी वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद राहणार असल्याचे पत्र आणि संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रेल्वे बंदची चर्चा ही वाऱ्यासारखी पसरली असतांना मध्य रेल्वेने मात्र असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले.

देशातील रेल्वेची नियमित वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद? सोशल मीडियावर जोरदार चर्चा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील रेल्वेची नियमित प्रवासी वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद राहणार असल्याचे पत्र आणि संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रेल्वे बंदची चर्चा ही वाऱ्यासारखी पसरली असतांना मध्य रेल्वेने मात्र असा कोणताही निर्णय झाला नसून सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या सेवा सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे. 

धक्कादायक! परदेशांतून परतणाऱ्या भारतीय प्रवाशांची विमानतळावर लूट; वाचा कुणी केलाय हा आरोप...

देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि लोकल उपनगरीय सेवा सुद्धा 12 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. यामध्ये दिल्लीसाठी धावणाऱ्या राजधानी मात्र सुरू राहणार आहे. त्याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी  धावणारी उपनगरीय सेवा ही सुरूच राहणार आहे. 

नागरिकांनो सजग राहा.. सायबर गुन्हेगारीत वाढ; राज्यात 'इतके' गुन्हे दाखल...

तर 1 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत बुकिंग करण्यात आलेल्या तिकीट सुद्धा रद्द केल्या असून त्याचा परतावा सुद्धा देण्यात येणार आहे. यापूर्वी 30 जूनपर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता.  

बाळ रडले अन् 'ती' जाहिरात कायद्याच्या कचाट्यात आली...

रेल्वेकडून कोणतीही अधिकृत घोषणा नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने 12 ऑगस्ट पर्यंत सर्व रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र, यावर अद्याप रेल्वे बोर्डाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई पोलिस आयुक्तांचं नागरिकांसाठी खास ट्विट, केलं हे आवाहन...

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या उपनगरीय गाड्या सुरूच राहतील. या व्यतिरीक्त उपनगरीय गाड्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
- प्रविण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

loading image
go to top