esakal | पर्यटकांना आता समुद्रकिनारी मिळणार चौपाटी कुटीचा आनंद; राज्यात 'या' किनाऱ्यावर मिळणार सुविधा...
sakal

बोलून बातमी शोधा

beach shacks

महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे.

पर्यटकांना आता समुद्रकिनारी मिळणार चौपाटी कुटीचा आनंद; राज्यात 'या' किनाऱ्यावर मिळणार सुविधा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : समुद्र पर्यटनाचा आनंद पर्यटकांना समुद्र किनारी तासनतास घेता यावा, म्हणून राज्य सरकारने राज्यातील 8 समुद्र किनाऱ्यार चौपाटी कुटी (बीच शॅक्स) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील समुद्र किनारा पर्यटनामध्ये वाढ होईल. या कुट्या तात्पुरत्या हंगामी स्वरुपाच्या असतील.

मुंबई पोलिस आयुक्तांचं नागरिकांसाठी खास ट्विट, केलं हे आवाहन...

सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर व तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली व दिवेआगार तर पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या 8 किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येणार आहेत. या बीच शॅक्सच्या संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. 

बाळ रडले अन् 'ती' जाहिरात कायद्याच्या कचाट्यात आली...

महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे. एका चौपाटीवर कमाल 10 कुटी उभारता येतील.

नागरिकांनो सजग राहा.. सायबर गुन्हेगारीत वाढ; राज्यात 'इतके' गुन्हे दाखल...

स्थानिकांना प्राधान्य
चौपाटी कुटी उभारण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल. या चौपाटी कुटीस सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशा वेळेत सुरु ठेवता येईल. तसेच संगीताचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील असेल. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी 80 टक्के जागा राखीव असतील. 

धक्कादायक! परदेशांतून परतणाऱ्या भारतीय प्रवाशांची विमानतळावर लूट; वाचा कुणी केलाय हा आरोप...

अशी असेल चौपाटी कुटी
या कुट्यांचे तीन वर्षांकरिता वाटप करण्यात येईल.  त्यांचा आकार 15 फूट लांबी आणि 15 फूट रुंद आणि 12 फूट उंच असेल. गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी 20 फूट लांब आणि 15 फूट रुंद छत टाकता येईल. कुटी मिळणाऱ्या व्यक्तीकरिता परवान्यासाठी 15 हजार रुपये अर्जाचे ना-परतावा मुल्य असेल. तसेच या कुटीसाठी पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱ्या वर्षी  55 हजार वार्षिक शुल्क राहील. याशिवाय 30 हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल. चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत.

loading image
go to top