esakal | मॉलमधील एकट्या मद्यविक्री दुकानाला परवानगी द्या; मुंबई उच्च न्यायालयाने दिले राज्य सरकारला आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

wine shop

माॅलमध्ये असलेल्या स्वतंत्र मद्यविक्री दुकानाला आॅनलाईन दारू विकण्याची परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले आहेत.

मॉलमधील एकट्या मद्यविक्री दुकानाला परवानगी द्या; मुंबई उच्च न्यायालयाने दिले राज्य सरकारला आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: माॅलमध्ये असलेल्या स्वतंत्र मद्यविक्री दुकानाला आॅनलाईन दारू विकण्याची परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले आहेत. अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये प्रशासनाने तांत्रिक द्रुष्टिकोन अवंलबवण्यापेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन वापरून निर्णय घ्यावा, असेही खंडपीठाने सुनावले आहे.

दक्षिण मुंबईमधील सीआर2 मॉलमध्ये असलेल्या मद्यविक्री दुकान मालकाने आॅनलाईन दारु विक्री करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. दुकान जरी मॉलमध्ये असले तरी त्याला स्वतंत्र प्रवेशद्वार आहे आणि ये-जा करण्यासाठी माॅलची आवश्यकता नाही. तसेच आॅनलाईनवर ऑडर घेऊन होम डिलिव्हरी करणार असल्यामुळे सुरक्षा नियमांचे उल्लंघन होणार नाही, त्यामुळे दुकानाला एकल दुकानाचा दर्जा देऊन परवानगी द्या, असा दावा याचिकेत केला होता. मुंबई महापालिकेने याचिकादाराची मागणी अमान्य केली होती. त्यामुळे त्याने न्यायालयात याचिका दाखल केली. 

हेही वाचा: सोनू सूदच्या पाठिशी भाजप; संजय राऊतांच्या लिखाणावर टीका..

न्या एस जे काथावाला आणि न्या एस पी तावडे यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ काॅन्फरन्सिंगमध्ये सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकादार दुकान मालकाची मागणी मान्य केली. अशा परिस्थितीत प्रशासनाने तांत्रिक मुद्दे विचारात घेण्यापेक्षा व्यावहारिकरित्या विचार करायला हवा, लाॅकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम होत आहे हे सर्वज्ञात आहे. 

त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून होणाऱ्या व्यावसायिक कामांचा विचार करायला हवा, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. दुकानाचा विचार एकल दुकान म्हणून करावा आणि त्याला परवानगी द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

हेही वाचा: अरे वाह! इमारतीत उभारलं आयसोलेशन सेंटर; कोरोना रुग्णांवर उपचारही होणार..   

महापालिका आयुक्तांनी माॅल सुरु करायला अद्यापही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे महापालिकेने मॉलमध्ये दुकान असल्यामुळे याचिकादाराला परवानगी नाकारली होती. मात्र याचिकादाराचे दुकान कटेनमेंट झोनमध्ये नाही, तसेच स्वतंत्र प्रवेशद्वार असल्यामुळे आणि आॅनलाईनवर डिलिव्हरी होणार असल्यामुळे तिथे गर्दी होणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

give permission to single wine shop in mall mumbai high court gives order 

loading image