जागतिक मंदीचे बाजारावर सावट; सेन्सेक्समध्ये १०१६.८४; तर निफ्टीत २७६.३०

जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली येत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आज जगभरातील जवळपास सर्वच शेअर बाजारांमध्ये घसरण
Global recession hits share market down trend Sensex nifty  US stock market Stagflation mumbai
Global recession hits share market down trend Sensex nifty US stock market Stagflation mumbaisakal

मुंबई : जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली येत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आज जगभरातील जवळपास सर्वच शेअर बाजारांमध्ये घसरण नोंदवण्यात आली. भारतीय शेअर बाजारातही त्यांचे पडसाद उमटत समभाग पावणेदोन टक्क्यांच्या आसपास कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,०१६.८४ अंशांनी घसरत ५४,३०४.४४ अंशांवर; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशाक निफ्टी २७६.३० अंशांनी गडगडत १६,२०१.८० अंशांवर बंद झाला.

जागतिक मंदीच्या भीतीमुळे काल अमेरिकी शेअरबाजार दोन टक्क्यांनी पडले होते. त्यामुळे आज आशियाई शेअर बाजारही दोन टक्क्यांच्या आसपास घसरले; युरोपीय मध्यवर्ती बँकेने २०११ नंतर प्रथमच दरवाढीचे संकेत दिले. त्यामुळेही शेअरबाजारातही सकाळपासून नकारात्मक वातावरण होते. वित्तसंस्था, आयटी आणि धातूनिर्मिती शेअरची जोरदार विक्री झाली.

‘स्टॅगफ्लेशन’ची भीती

स्टॅगफ्लेशनच्या भीतीने आज जगातील सर्वच शेअरबाजारांमध्ये गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. ‘स्टॅगफ्लेशन’ म्हणजे स्टॅगनंट व इन्फ्लेशन यांचे एकत्रीकरण. म्हणजेच विकास ठप्प होणे आणि चलनवाढीमुळे महागाई होऊन दरवाढ होणे. ही स्थिती दाखविण्यासाठी ‘स्टॅगफ्लेशन’ हा शब्द वापरण्यात येतो.

रुपयाही नीचांकी पातळीवर

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज भारतीय रुपया ७७.८५ अशा नीचांकी स्तरावर गेला. आज दिवसभरात व्यवहार सुरू असताना त्याने ७७.८७ असा सार्वकालिक नीचांक गाठला होता. रिझर्व्ह बँकेने रुपयाच्या दरात हस्तक्षेप न केल्यामुळे आणि आयातदार डॉलरच्या खरेदीमागे धावत असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. दुसरीकडे जागतिक बँकाही व्याजदर वाढवण्याच्या तयारीत असल्यानेही डॉलरला बळ मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com