

Special Insurance Scheme Announced for Govindas Ahead of Dahi Handi Festival
-नितीन बिनेकर
मुंबई: दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच राज्यभरातील गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे. मानवी मनोरे उभारताना सरावादरम्यान अपघात होण्याच्या घटना लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने यंदा अतिरिक्त सराव करणाऱ्या गोविंदांसाठी विशेष अपघाती विमा योजना जाहीर केली आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत प्रत्येक गोविंदाला १० लाख रुपयांचे विमा संरक्षण, तर अपघात झाल्यास रुग्णालयीन उपचारासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च उपलब्ध होणार आहे.