

mumbai local
esakal
- नितीन बिनेकर
मुंबई - लोकलच्या गर्दीने हैराण झालेल्या मुंबईकरांना स्वातंत्र्यदिनी मध्य रेल्वेने दिलासा दिला आहे. उद्यापासून १२ डब्यांच्या २२ लोकलचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या ३२ वरून ५४ झाली आहे. तीन अतिरिक्त डब्यांमुळे प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार आहे. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.