Mumbai Local Train
ESakal
- नितीन बिनेकर
मुंबई - मध्य रेल्वेच्या लोकलमधील वाढत्या गर्दीने त्रस्त असलेल्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोमवारपासून मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी सध्या धावणाऱ्या १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या २२ वरून ३२ वर पोहोचणार असून, गर्दीच्या वेळेतील प्रवाशांचा ताण काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.