esakal | कोरोनाच्या बिकट वातावरणात मुंबईकरांसाठी चांगली बातमी

बोलून बातमी शोधा

Mumbaikars

राज्यावर मोठं संकट असलं तरी कोरोना हळूहळू आटोक्यात येतोय

कोरोनाच्या बिकट वातावरणात मुंबईकरांसाठी चांगली बातमी
sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईत लसीकरणासह कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत असून आतापर्यंत 54 लाख 90 हजार 241 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्के असून कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर हा 0.66 टक्के इतका आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांना दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी हा दिवसेंदिवस वाढत असून होऊन 103 दिवसांवर आला आहे. याचाच अर्थ रूग्णवाढीचा दर हा दिवसागणिक कमी होत असल्याचं चित्र आहे.

हेही वाचा: "आघाडीवाल्यांनो, तुमचं म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना"

आज 3 हजार 672 नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 6 लाख 56 हजार 204 इतका झाला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 57 हजार 342 हजारांवर आला आहे. नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याने रुग्णवाढीचा दर 0.66 पर्यंत खाली आला आहे. मुंबईत आज दिवसभरात 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 13 हजार 330 वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यांपैकी 35 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 48 पुरुष तर 31 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 4 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते.  32 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 43 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

हेही वाचा: "योग्य वेळी त्यांचा कार्यक्रम करू"; फडणवीसांचा थेट इशारा

सध्या मुंबईत 107 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 903 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 24 हजार 195 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये  अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 894 करण्यात आले.

धारावीत 24 नवे रुग्ण

धारावीतील रुग्णसंख्यानियंत्रणात आली असून धारावीत आज 24 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6497 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 28 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 8939 झाली आहे. माहीम मध्ये 24 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9037 इतके रुग्ण झाले आहेत.मुंबई प्रमाणे जी उत्तर मधील रुग्णसंख्या देखील  कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 76 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 24,473 झाली आहे.

(संपादन- विराज भागवत)