esakal | मालवाहतुकीतील अडचणी दूर होणार, आरटीओतून मिळणार परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

transport

लॉकडाऊन असला, तरी मालवाहतुकीला बंदी नाही. सुरक्षेसाठी, पोलिसांची अडचण येऊ नये म्हणून वाहनचालकांना परिवहन विभागाकडून परवानगी दिली जाते. राज्यातील 50 प्रादेशिक परिवहन विभाग आणि 24 तपासणी नाक्‍यांवरून अशी परवानगी मिळणार आहे. 

मालवाहतुकीतील अडचणी दूर होणार, आरटीओतून मिळणार परवानगी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊन असला, तरी मालवाहतुकीला बंदी नाही. सुरक्षेसाठी, पोलिसांची अडचण येऊ नये म्हणून वाहनचालकांना परिवहन विभागाकडून परवानगी दिली जाते. राज्यातील 50 प्रादेशिक परिवहन विभाग आणि 24 तपासणी नाक्‍यांवरून अशी परवानगी मिळणार आहे. 

मोठी बातमी ः कोरोनाचा मुकाबला करायचा असेल तर हा आहे एकमेव पर्याय

मालवाहतूक करणारे वाहन चालक, मालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी परिवहन विभागाने 24 तास नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. मालवाहतूक परवानगीबाबत अधिक माहितीसाठी 022-24036221 हा दूरध्वनी क्रमांक किंवा mh03@mahatranscom.in या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य परिवहन आयुक्तांनी केले आहे. 

महत्वाची बातमी ः धक्कादायक! 24 तासांत 5 पोलिसांना कोरोनाची लागण 

या तपासणी नाक्‍यांवर सुविधा 
अच्छाड (पालघर), इन्सुली (सिंधुदुर्ग), कागल (कोल्हापूर), चंदगड (कोल्हापूर), नांदणी (सोलापूर), मारवाडे (सोलापूर), उमरगा (उस्मानाबाद), भोकर (नांदेड), बिलोली (नांदेड), देगलूर (नांदेड), पिंपळखुटी (यवतमाळ), राजुरा (चंद्रपूर), वरूड (अमरावती), खारपी (अमरावती), मानेगाव (नागपूर), खुर्सापूर (नागपूर), केलवड (नागपूर), देवरी (गोंदिया), चारवड (जळगाव), कारकी (जळगाव), हादाखेड (धुळे), अक्कलकुवा (नंदुरबार), नवापूर (नंदुरबार), बोरगाव (नाशिक) 

हे वाचा ः मुंबईकरांना गुड न्यूज! कोरोना रुग्णांसह मृत्युदरही घटला, जाणून घ्या आकडेवारी

ई-पाससाठी ऑनलाईन अर्ज 

  •  संकेतस्थळ https://transport.maharashta.gov.in 
  •  "अप्लाय फॉर ई-पास व्हेईकल'वर क्‍लिक करा. 
  •  आरटीओ जिल्हा निवडून वाहन मालक व चालकाचे नाव द्या. 
  •  वाहन चालकाचा परवाना क्रमांक, चालक व मालकांचे मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी नोंदवा. 
  •  वाहन क्रमांक, चेसी क्रमांकाचे शेवटचे 5 आकडे, प्रकार नोंदवा. 
  •  मालाचा प्रकार, वाहून नेण्याचा मार्ग, ई-पास कालावधी नमूद करा. 
  •  ऍप्लिकेशन रेफरन्स नंबरनुसार आरटीओ कार्यालयाकडून अर्जाचा स्वीकार. 
  •  वाहनाचा ई-पास पीडीएफ स्वरूपात अर्जदाराच्या ई-मेल आयडीवर पाठवला जाईल. 
  •  अर्जदाराला या ई-पासची प्रिंट घेता येईल.
loading image
go to top