कोरोनामुळे गुगल आणि फेसबुक या दोन मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

कोरोनामुळे गुगल आणि फेसबुक या दोन मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगलचे ऑफिस एक जूनपूर्वी उघडणार नाही असे सांगितले होते.  मात्र आता गुगल आणि फेसबुकने आपल्या कर्मचा-यांना 2020 च्या अखेरीसपर्यंत घरून काम करण्याची मुभा दिली आहे. यापूर्वी गुगलने सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे कळवले हो. कोरोना विषाणूमुळे जूनपर्यंत कार्यालयात येणे शक्य नाही, मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांचे वर्क फॉर्म होम मध्ये मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात पसरत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मूभा दिली आहे.  फेसबुक 6 जुलैपासून आपली सर्व कार्यालये पुन्हा सुरु करण्याच्या विचारात असल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले. मात्र असं असलं तरी ज्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची इच्छा आहे ते घरुन काम करु शकतात अशी मूभा देण्यात येणार असल्याचे समजते.

यासंदर्भात सर्व नियोजन झाले असून कंपनीचा संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग याबद्दलची घोषणा करु शकतो. फेसबुकने हा निर्णय घेताना अनेक गोष्टींचा विचार केला आहे. आरोग्य यंत्रणांनी दिलेला इशारा, सरकारने दिलेला इशारा या सर्वांचा विचार करुन कंपनीने काही कर्मचाऱ्यांना कार्यलयातून काम करण्यासंदर्भात परवानगी देऊ शकते. सध्या तरी कंपनीचे अनेक कर्मचारी हे घरुनच काम करत आहेत. याआधीच फेसबुकने 2021 पर्यंतचे सर्व इव्हेंट रद्द करण्याची घोषणा केली आहे.

फेसबुकबरोबरच  गुगलनेही आपल्या कर्मचाऱ्यांना 2020 संपेपर्यंत घरुन काम करण्यासंदर्भात सुचना दिल्या आहे.  गुगल अल्फाबेटचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ज्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करणं शक्य आहे त्यांनी 2020 संपेपर्यंत घरुनच काम करावे असं सांगितलं आहे. आधी कंपनीने कर्मचारी 1 जूनपर्यंत घरुन काम करतील असं म्हटलं होतं. ऑनसाईट काम कऱणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनी जून किंवा जुलैमध्ये आपली कार्यालये सुरु करणार असल्याचेही पिच्चाई यांनी स्पष्ट केलं आहे. लोकांनी थेट एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून कार्यालयामधील व्यवस्थापना संदर्भात कंपनी अतिरिक्त काळजी घेणार असल्याचेही स्पष्ट केलं आहे.

google and facebook extends period of work from home till December 2020

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com