मुसळधार पावसात घरं गमावणाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच निधी होणार वितरीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

२६ जुलै 2019 नंतर मुसळधार पावसात ज्यांची घरं पडली आहेत अशा नागरिकांसंदर्भात महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये 26 जुलै नंतर मुसळधार पावसामुळे ज्यांची घरं पडलीयेत अशांना महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सरकारकडून आता मदत जाहीर करण्यात आली आहे.

यासंदर्भात राज्य सरकारकडून अमरावती, पुणे, कोकण या तीन विभागांसाठी मदत निधी वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 227 कोटी 73 लाख 86 हजार 600 रुपयांचा निधी वितरीत केला जाणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ?
 
अमरावती, पुणे, कोकण या तीन विभागात मुसळधार पावसामुळेज्यांची घरं पडली त्यांच्यासाठी हा दिलासा मनाला जातोय. यामध्ये ज्यांची घरं पडलीयेत त्यांना पंतप्रधान आवास योजना, शबरी, रमाई आणि आदिम योजनेतून घरकुल बांधून दिलं जाणार आहे.  

महत्त्वाच्या बातम्या :  'या' ठिकाणी बुलेट ट्रेनची कारशेड  बांधल्यास 48 हजार कोटींचा तोटा 

यामध्ये NDRF आणि SDRF च्या नियमानुसार आर्थिक मदत केली जाणार आहे. दरम्यान  मागील सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीने निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी नव्या सरकारने आज तातडीने केल्याचं पाहायला मिळतंय. 

WebTitle : government to distribute funds for citizens who lost their homes in heavy rains after 26th july 2019

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government to distribute funds for citizens who lost their homes in heavy rains after 26th july 2019