संतसाहित्य संमेलनास अनुदान सरकारकडे आग्रह धरू; प्रवीण दरेकर यांची ग्वाही

संतसाहित्य संमेलनास अनुदान सरकारकडे आग्रह धरू; प्रवीण दरेकर यांची ग्वाही

मुंबई  ः संत साहित्य संमेलनास मराठी भाषा विभागातून कायमस्वरूपी अनुदान मिळण्यासह वारकरी-फडकरी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी विधीमंडळात तसेच सरकारदरबारी कसोशीने प्रयत्न करू, अशी हमी विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे दिली. 

वारकरी साहित्य परिषद आयोजित नवव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २०२० चा सांगता समारंभ आज दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, संमेलनाध्यक्ष चकोर महाराज बाविस्कर, अमृत महाराज जोशी, रामकृष्ण महाराज लहवितकर, सुरळकर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांसमोर बोलताना दरेकर यांनी वरील ग्वाही दिली. महाराष्ट्राला सांप्रदायिक परंपरा आहे. समाजाचे प्रबोधन करण्याचे काम गेली अनेक वर्षे या परंपरेतील धुरिणांनी केले आहे. वारकरी साहित्य परिषद ही वारकरी संप्रदायांना एकत्रित करून संप्रदायाचे साहित्य निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. संप्रदायाच्या माध्यमातून परमार्थिक वारसा जपण्याचे सर्वांगीण काम संतसाहित्य संमेलनात होत असते. हिंदुत्वाचा भगवा पुढे नेण्याचे व टिकविण्याचे काम संप्रदायी मंडळी करीत आहेत, असे प्रशंसोद्गार दरेकर यांनी काढले. 

राजकारणात काम करताना चांगल्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. राजकारणात कोणत्याही व्यक्तिला शेवटपर्यंत समाधान मिळत नसते. त्या व्यक्तिला एखादे पद मिळाले तरी त्याच्या अपेक्षा वाढत असतात. त्यामुळे राजकारणात कुठलेही सर्वोच्च पद मिळाले तरीही समाधान होत नसते. मग या समाजात सुखी माणूस कोण, असा जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळी जो संप्रदायाच्या माध्यमातून परमार्थाची सेवा करतो तो सुखी माणूस असेही विश्लेषण दरेकर यांनी केले. 

फडकरी बांधवांसाठी संतपीठ निर्माण करणे, त्यांना मासिक मानधन मिळवून देणे, इंद्रायणी, भीमा आणि निरा या तीन नद्यांची पात्रे प्रदूषणमुक्त करणे, तसेच आळंदी येथील वारकरी व खंडकरी जमिनीवरील आरक्षण रद्द करणे, अशा विविध प्रकारच्या मागण्या आपण केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी विधीमंडळात आणि सरकारकडे आग्रह धरण्यात येईल असेही दरेकर म्हणाले.

राम मंदिरावरील विधाने दुर्दैवी

शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या, हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला. पण आता शिवसेनेचे नेते राम मंदिराच्या उभारणीसंदर्भात चुकीची विधाने करित आहेत. ही दुर्दैवाची बाब आहे, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली

the government a grant to the Santasahitya Sammelan said Praveen Darekar

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com