सत्र न्यायालयात कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होत नाही म्हणून सरकारी वकिलांचा थेट राजीनामा

सुनीता महामुणकर
Thursday, 26 November 2020

कोविड 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सत्र न्यायालयात सुरक्षा नियमांचे पालन होत नाही, या कारणावरून ज्येष्ठ महिला सरकारी वकीलांनी राजीनामा दिला आहे.

मुंबई, ता. 26 : कोविड 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सत्र न्यायालयात सुरक्षा नियमांचे पालन होत नाही, या कारणावरून ज्येष्ठ महिला सरकारी वकीलांनी राजीनामा दिला आहे. यामुळे न्यायालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

भायखळा कारागृहातील बंदी मंजुळा शेटे मृत्यू खटल्यातील सरकारी वकील विद्या काळसे यांनी मागील आठवड्यात राजीनामा दिला. कोरोना साथीमध्ये सत्र आणि दिवाणी न्यायालयात आवश्यक सुरक्षा तत्वांचे पालन केले जात नाही, असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. राज्यातील सात महत्त्वाच्या आणि संवेदनशील खटल्यांंमध्ये त्यांंची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मागील आठवड्यात त्यांनी राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडे राजीनामा पत्र दिले. 

महत्त्वाची बातमी : काय सांगता ? शिवसेना आणि भाजप आलेत एकत्र आणि प्रस्तावही झाला मान्य, काँग्रेसचा सभात्याग; कोणता होता हा प्रस्ताव?

दोन आठवड्यापासून मी न्यायालयात येत आहे. पण सुरक्षित अंतर राखणारी यंत्रणा न्यायालयात नाही. तसेच सॅनिटायझरची व्यवस्थाही केलेली नाही. माझ्याकडे असलेल्या कामामुळे मला नियमित न्यायालयात यावे लागते. मी माझे काम सांभाळू शकते. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझ्या आरोग्याला आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे पत्रात नमूद केले आहे.

2017 मधील मंजुळा शेटे मृत्यू, 2015 चा साकिनाका बलात्कार खटला ज्यामध्ये पोलिस कर्मचारी आरोपी आहेत. या प्रकरणात तीन पोलिसांसह नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. काही खटल्यांची सुनावणी ऑनलाईन घेण्याची विनंती कासले यांनी केली होती. मात्र ही विनंती न्यायालयाने मान्य केली नाही. त्यामुळे काही प्रकरणे करायची अशी भूमिका न घेता राजीनामा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. न्यायालय नियोजन निश्चित करण्यात आले असले तरी त्याची अमंलबजावणी होत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

महत्त्वाची बातमी : अखेर मान्यता मिळाली ! मुंबईत सुरु होणार स्वदेशी कोव्हॅक्सिन लसीची सर्वात मोठी चाचणी

उच्च न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांमध्ये  सत्र न्यायालयांंना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची मुभा दिली आहे.

government lawyer resigned because social distancing and covid rules are not observed 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government lawyer resigned because social distancing and covid rules are not observed