विधानपरिषद सदस्य कोण, वाद थांबेना; मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; कॉंग्रेसतर्फे उर्मिला मातोंडकर ?

मृणालिनी नानिवडेकर
Tuesday, 27 October 2020

रकार आणि राज्यपाल यांच्या शीतयुध्दात ही नावे मंजूर केली जातील का याबद्दलही उत्सुकता आहे.

मुंबई : राज्यपालनियुक्त १२ सदस्यांची नावे मंत्रिमंडळाच्या उद्याच्या बैठकीपूर्वी निश्चित होत नसल्यानेही आता परवाचा म्हणजेच २९ तारखेचा मुहुर्त निश्चित करण्यात आला आहे. कलाकार लेखक साहित्यिक यांना राज्यपालांनी नियुक्त करावे असा संकेत असल्याने कॉंग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव पुढे केले आहे. शिवसेनेकडून आदेश बांदेकर यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला प्रत्येकी चार जागा मिळणार असे ठरले आहे. कॉंग्रेसकडून सचिन सावंत, सत्यजित तांबे, रजनी पाटील अशी नावे पुढे आली. हे तिघेही मराठा आहेत. त्यावर आक्षेप घेण्यात आले. नसीम खान यांचेही नाव अल्पसंख्यांक मते लक्षात घेवून पुढे आले. मात्र पराभुतांना संधी का असा प्रश्न केला गेला.ही नावे कलाकार साहित्यिक वर्गात नाहीत असे सांगत राज्यपालांनी नाकारली तर असा प्रश्नही पुढे आला आहे. त्यामुळे कॉंग्रेसने व्यूहरचना बदलत उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढलेल्या उर्मिला मातोंडकर यांचे नाव पुढे केले. त्यांचे पती अल्पसंख्यांक आहेत. मावळते सदस्य वास्तुरचनाकार अनंत गाडगीळ लेखक आहेत. प्रवक्ते सचिन सावंत यांचा दावा योग्य असल्याने त्यांच्या समवेत गाडगीळांना पुन्हा संधीचा विषयही चर्चेत आहे. मात्र या संबंधात कोणतेही एकमत होत नसल्याने उद्याची मंत्रिमंडळ पुढे ढकलण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता; BMC कडून 50 हजार खाटांची तयारी 

सेनेकडून नार्वेकर बांदेकर 

दरम्यान शिवसेनेकडून अभिनेते आदेश बांदेकर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे खास उपसचिव  मिलिंद नार्वेकर तसेच युवासेनेचा एक पदाधिकारी अशी नावे चर्चेत आहेत. महिला आघाडीला आजवर कधीही संधी दिली गेली नसल्याने त्यांनीही आग्रह कायम ठेवला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही नावे निश्चित केली असून एक ज्येष्ठ पत्रकार, एक साहित्यिक, एक महिला आणि अभिनेत्री अशी ही नावे आहेत. सरकार आणि राज्यपाल यांच्या शीतयुध्दात ही नावे मंजूर केली जातील का याबद्दलही उत्सुकता आहे.

हेही वाचा : कंगनाच्या अडचणी वाढणार? कंगनावर कारवाईसाठी वकिलांचे महाधिवक्त्यांना पत्र

( संपादन - सुमित बागुल )

governor appointed MLAs congress may give chance to urmila matondkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: governor appointed MLAs congress may give chance to urmila matondkar