कपिल सिब्बल यांनी दिला कानमंत्र, म्हणालेत 'ही' चूक सुधारा...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन ६ महिन्यांचा काळ उलटून गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याबाबत चर्चा सुरु आहे.

मुंबई: महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन ६ महिन्यांचा काळ उलटून गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याबाबत चर्चा सुरु आहे. त्यात मुंबई उच्च न्यायालयानं यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा निर्णय राज्यपालांवर सोपवला आहे. मात्र राज्यपालांकडे अशी  शिफारस करण्यासाठी बोलावण्यात आलेली मंत्रिमंडळाची बैठक नियमात बसत नाही असं काही कायद्याच्या तज्ज्ञांचं मत आहे. मात्र काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि सुप्रीम कोर्टाचे वकील कपिल सिब्बल यांनी अशाप्रकारची बैठक पुन्हा  बोलावणं योग्य ठरेल असं सांगितलंय.

१५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीच्या विषय पत्रिकेत उद्धव ठाकरे यांची शिफारस करण्याचा कुठेही उल्लेख नव्हता. उपमुख्यमंत्रीपद घटनात्मक नाही, संच या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार असून त्याच्याऐवजी अजित पवार हे अध्यक्षस्थानी असतील याबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या बैठकीवर आक्षेप घेत पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्ते राजेश पिल्ले यांनी यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती.

८ डिसेंबर 2020 ला संपूर्ण जग होणार COVID19 मुक्त; भारताची तारीख आहे २०...

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडतेय. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत पुन्हा निर्णय घेतला जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच्या अध्यक्षतेखाली पुन्हा बैठक होणार आहे. मात्र यामध्ये आधी झालेल्या तांत्रिक त्रुटी वगळून पुन्हा एकदा राज्यपालांना याबाबत निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती समोर येतेय. 

governor elected MLA kapil sibbal gave advise to the ministers of maharashtra

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: governor elected MLA kapil sibbal gave advise to the ministers of maharashtra