esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पालकमंत्री अदिती तटकरे यांनी तीर्थक्षेत्र पालीतील बल्लाळेश्वराचे घेतले दर्शन

sakal_logo
By
अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : राज्य सरकारने नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार पासून सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्थरातून स्वागत होत आहे. मात्र कोरोनाचे (Corona) संकट अजूनही टळलेले नाही त्यामुळे भाविकांनी दर्शन घेत असतांना सर्व नियम व निकषांचे पालन करावे असे आवाहन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी केले. अदिती तटकरे यांनी गुरुवारी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीतील (Pali) बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले.

तटकरे पुढे म्हणाल्या की भाविक आज खूप आनंदी आहेत. कोरोना संदर्भातील अटी व नियम प्रत्येक धार्मिक संस्था व विश्वस्त पाळतीलच मात्र एक भाविक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून दर्शन घेतांना नियम व अटी पाळाव्यात असे आवाहन देखील अदिती तटकरे यांनी केले. तसेच बल्लाळेश्वर तीर्थक्षेत्र विकासा संदर्भात आढावा देखील घेतला. यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे अदिती तटकरे यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: डाॅक्टरांच्या संपाचा तिसरा दिवस; उद्या ओपीडी बंद, शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला रायगड जिल्हा अध्यक्षा गीता पालरेचा, तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे, युवक अध्यक्ष संदेश शेवाळे, अभिजित चांदोरकर, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड धनंजय धारप उपाध्यक्ष विनय मराठे व सर्व विश्वस्त यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image
go to top