गुजरात, राजस्थानातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक; परराज्यातून येणाऱ्यांची रेल्वेस्थानकावर तपासणी

मिलिंद तांबे
Sunday, 29 November 2020

अनलॉकनंतर मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता लक्षात घेता परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे त्यात गुजरात, राजस्थानमधून आलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दीर्घकालीन आजार तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन टास्क फोर्सने केले आहे.

मुंबई : अनलॉकनंतर मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता लक्षात घेता परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे त्यात गुजरात, राजस्थानमधून आलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दीर्घकालीन आजार तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन टास्क फोर्सने केले आहे.

रेल्वे प्रशासन कधी जागे होणार? महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपाययोजनेची मागणी

मुंबईत परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यापैकी अनेक रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. एका पालिका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तपासणीत आढळलेल्या रुग्णांमध्ये राजस्थान आणि गुजरातमधील प्रवाशांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील रुग्णांचा आकडाही अधिक आहे. त्यामुळे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून विविध रेल्वे स्थानकांवर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. 

कोरोनामुक्तीनंतरही आरोग्याकडे दुर्लक्ष नकोच! आमदार भालकेंच्या निधनानंतर गुंतागुंतीची समस्या ऐरणीवर

शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने पालिका प्रशासन सावध झाले आहे. रुग्णवाढ थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यातील टास्क फोर्सने 55 वर्षांवरील अधिक जोखमीच्या रुग्णांना कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले लोक अधिक जोखीम प्रकारात येतात. त्यासाठी पालिकेने रुग्णांना शोधून काढणे, अधिक जोखीम ओळखणे आणि मनुष्यबळ जपणे या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. 

विना मास्क फिराल, तर घ्यावा लागेल 200 रुपयांचा मास्क; मुंबई महापालिकेची गांधीगिरी!

परराज्यातून येणाऱ्या रेल्वेप्रवाशांची तपासणी केली जात आहे. दररोज सरासरी 10 बाधित रुग्णांची नोंद होत आहे. गुजरात, हरियाणा, गोवा तसेच दिल्लीतून येणाऱ्या प्रवाशांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. 
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

---------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat, Rajasthan has the highest number of patients; Check of foreigners arriving at the railway station