esakal | एकीचे बळ! बिबट्यापुढे भटके कुत्रे ठरले भारी; बिबट्याला लावले पळवून....
sakal

बोलून बातमी शोधा

puppy

कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने गोळा झालेल्या गोरेगाव येथील गृहनिर्माण सोसायटीतील लोकांनी जखमी कुत्र्याच्या पिलावर उपचार केले. त्याच्या मानेवर दाताचे व्रण होते तसेच शरीरावरही अन्य जखमा होत्या

एकीचे बळ! बिबट्यापुढे भटके कुत्रे ठरले भारी; बिबट्याला लावले पळवून....

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : आरे कॉलनीतून बिबट्याने कुत्र्याच्या छोट्या पिलाला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भटक्या कुत्र्यांनी बिबट्याला लक्ष्य केले. त्याला आपल्या भुंकण्याने हैराण करताना त्याची कोंडी केली आणि अखेर बिबट्या तोंडात धरलेल्या छोट्या कुत्र्याच्या पिलाला सोडून जंगलात निघून गेला.

नियतीची अशीही परीक्षा; आई कस्तुरबा रुग्णालयात तर बाळ ऑपरेशन थिएटरमध्ये...

कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने गोळा झालेल्या गोरेगाव येथील गृहनिर्माण सोसायटीतील लोकांनी जखमी कुत्र्याच्या पिलावर उपचार केले. त्याच्या मानेवर दाताचे व्रण होते तसेच शरीरावरही अन्य जखमा होत्या. या सोसायटीच्या शेजारीच जंगल आहे. तिथे रात्री बिबट्या आला होता. बिबट्याने सोसायटीच्या दारात असलेल्या कुत्र्याच्या पिलाला आपल्या तोंडात पकडले आणि जंगलाकडे निघाला

 मुंबई विमानतळाच्या कामात मोठा गैरव्यवहार उघड; जीव्हीकेच्या अध्यक्षासह 'इतके' जण सीबीआयच्या रडारवर...

बिबट्या कुत्र्याच्या पिलाला जंगलाकडे खेचून नेत असताना पिलू जोरदार किंचाळत होते. ते पाहून भटके कुत्रे कुत्र्याच्या पिलाच्या मदतीस धावून आले. त्यात त्या पिलाची आईही होती. त्या सर्वांनी बिबट्याकडे पाहून गुरगुरण्यास सुरुवात केली तसेच ते जोरजोरात भूंकत होते. अखेर बिबट्याने त्या पिल्लाला सोडून जंगलात धाव घेतली. तोपर्यंत सोसायटीतील अनेक जण आवारात जमले होते. 

आता सुट्या पैशांची कटकट मिटली! बसमध्ये टिकीट घेतांना वापरा 'ही' पेमेंट पद्धत

सोसायटीतील अनेकांनी या जखमी कुत्र्याच्या पिलावर उपचार केले. त्याची जखम धुतली. त्यावर औषधोपचार केले. त्याला खायला दिले. त्याला तापही आला होता. दहा दिवसात या परिसरातील सहा भटकी कुत्री दिसेनाशी झाली आहेत. त्यांना बिबट्यानेच यापूर्वी पळवून नेले असेल अशी भीती व्यक्त करण्यात आली. येथील नागरीकांनी बिबट्यासाठी सापळा रचण्याची सूचना केली असल्याचा दावा केला, पण जंगलातील आधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगितले.