नियतीची अशीही परीक्षा; आई कस्तुरबा रुग्णालयात तर बाळ ऑपरेशन थिएटरमध्ये... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

operationq

वेळीच शस्त्रक्रिया केली नाही तर जीव वाचणे अवघड अशा अवघड पेचात सापडलेल्या अहमदनगर येथील या कुटुंबाने बाळाच्या उपचारासाठी मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पीटल गाठले. पालक बाळाला घेऊन रुग्णालयात पोहोचले तेव्हा बाळाची प्रकृती खालावली होती.

नियतीची अशीही परीक्षा; आई कस्तुरबा रुग्णालयात तर बाळ ऑपरेशन थिएटरमध्ये...

मुंबई : अहमदनगर येथील रहिवासी असलेल्या जोडप्याला आई-बाबा झाल्याचा प्रचंड आनंद झाला होता. बाळाचा जन्म झाला तेव्हा वजनही निरोगी बाळाप्रमाणेच 2.5 किलो इतके होते. तसेच कोरोना सारख्या संकटकाळातही बाळ सुखरुप जन्माला आल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होते; मात्र जन्मानंतर आठवड्याभरातच बाळाला स्तनपानावेळी श्वासोच्छवासात अडचणी येऊ लागल्या. बाळाच्या पालकांनी त्वरित जवळील बालरोगतज्ञांची भेट घेतली. त्यावेळी बाळाची इको-कार्डियाग्राफी तपासणी केली असता बाळाच्या श्वासाचा वेग वाढणे तसेच हदयदोष आढळून आला. तसेच बाळाच्या महाधमनीत ब्लॉकेज दिसून आले. तसेच बाळाचा हार्ट पंपिंग रेट 15 ट्क्के इतका कमी असून सर्वसामान्यांमध्ये तो कमीतकमी 55 टक्के इतका असतो.

 मुंबई विमानतळाच्या कामात मोठा गैरव्यवहार उघड; जीव्हीकेच्या अध्यक्षासह 'इतके' जण सीबीआयच्या रडारवर...

वेळीच शस्त्रक्रिया केली नाही तर जीव वाचणे अवघड अशा अवघड पेचात सापडलेल्या अहमदनगर येथील या कुटुंबाने बाळाच्या उपचारासाठी मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पीटल गाठले. पालक बाळाला घेऊन रुग्णालयात पोहोचले तेव्हा बाळाची प्रकृती खालावली होती.  बाळामध्ये असलेला दुर्मिळ–हदयदोष दुर करण्यासाठी वाडिया हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी 'बलून एओर्टिक वाल्वोटॉमी' ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून बाळाला नव्याने जीवनदान मिळाले.

थरथरत्या हाताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका,असू शकतो 'हा' मेंदूचा गंभीर आजार

बाळाला असणारा हा जन्मजात दोष एकूण लोकसंख्येच्या 2% बाळांमध्ये दिसून येतो, त्यापैकी 15-20% हदयाच्या झडपा ब्लोकेज, तर 25% बाळांमध्ये जन्माच्या 1 महिन्यानंतर ही स्थिती पाहायला मिळते. बाळाची प्रकृती पाहता हार्ट व्हॉल्व्ह उघडण्यासाठी त्वरीत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शल्यक्रिया करण्यास उशीर केल्याने कदाचित त्याचे आयुष्यही धोक्यात येऊ शकते. म्हणूनच बाळाला पुढील प्रक्रियेसाठी 'कार्डियाक कॅथेटरिझेशन' प्रयोगशाळेत हलविण्यात आले. 

आता सुट्या पैशांची कटकट मिटली! बसमध्ये टिकीट घेतांना वापरा 'ही' पेमेंट पद्धत

शस्त्रक्रियेपूर्वी नियमाप्रमाणे कोरोनाच्या चाचणीसाठी बाळ आणि आईची स्वॅब टेस्ट करण्यात आली. तपासणीत बाळ निगेटिव्ह; मात्र आई कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आईला तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर बाळाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.

मुंबईत ऑरेंन्ज अलर्टचा इशारा! दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

डॉक्टरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरेक्षेविषयी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत बाळाच्या शस्त्रक्रियेकरिता सज्ज झाले होते. चार विविध थरांनी सुरक्षित असे पीपीई किटचा वापर शस्त्रक्रियेवेळी करण्यात आला. बाळाला त्वरित आयसोलेशन युनिटमध्ये दाखल केले आणि श्वासोच्छवासाच्या तीव्र अडचणी लक्षात घेता व्हेंटिलेटरवर ठेवले. सुमारे 2 तास बाळाची शस्त्रक्रिया करण्यात आली. 'बलून एओर्टिक वाल्वोटॉमी' किंवा 'बलून एओर्टिक व्हॅल्व्हुलोप्लास्टी'मध्ये 'डिफिलेटेड बलूनसह कॅथेटर'चा वापर करून हृदयाचा कॅथेटरिझेशनद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. 

कोरोनाने तोडल्या जाती-धर्माच्या भिंती; मरीनलाईन्सच्या मुस्लिम बक्रस्तानात हिंदू बांधवांवर अंत्यसंस्कार...

शस्त्रक्रियेमध्ये कॅथेटर रक्तवाहिनीत घातला जातो. हे अरुंद व्हॉल्वमध्ये हलविले जाते आणि हृदयाच्या झडपा उघडण्यासाठी फुगा फुगविला जातो. या जोखमीच्या शस्त्रक्रिये नंतर 'इकोकार्डिओग्राफी'ने हृदय पंपिंग क्षमतेत त्वरित लक्षणीय सुधारणा दिसली.  वाडिया रूग्णालयात आम्ही कोविड संसर्ग झालेल्या मुलांबरोबरच इतर गंभीर दोष असलेल्या मुलांच्या उपचाराकरिता आम्ही विशेष खबरदारी घेत आहोत. यशस्वी उपरांसाठी आमचे डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांच्या टीम झोकून काम करत असल्याने यश मिळत आहे.
- डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स.

"कोरोनाच्या भीतीमुळे आम्ही खूपच घाबरलो होतो. त्यात पहिल्या बाळाच्या जन्मानंतर आम्हाला आनंद झाला. जेव्हा त्याला हृदयदोष असल्याचे निदान झाले; तेव्हा मात्र आम्हाला मोठा धक्का बसला. वाडिया हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी आम्हाला धीर देत वेळेवर व तातडीने उपचार केले नसते, तर आम्ही आमच्या बाळाला गमावले असते. पण डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे माझ्या बाळाला जीवनदान मिळाले असून त्यांचे खूप उपकार आहेत.
- बाळाचे वडील.