'या' अभिनेत्रीच्या फेसबुकवर अश्लील कमेंट करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

मिरा रोड : मराठी चित्रपट अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या फेसबुक पेजवर अश्‍लिल शब्दात कमेंट करणाऱ्या व्यक्तीविरोधात मिरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा रोड : मराठी चित्रपट अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या फेसबुक पेजवर अश्‍लिल शब्दात कमेंट करणाऱ्या व्यक्तीविरोधात मिरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - शिक्षक वर्गातच करत होता मुलींवर लैंगिक अत्याचार

मिरा रोड येथे राहणाऱ्या घाडगे यांनी काल रात्री एक वाजता आपल्या मोबाईलवरुन चित्रपटाच्या लावण्याची शूटिंग करत असतानाचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यानंतर त्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्या वाचत असतानाच सरूप पांडा नामक अनोळखी इसमाने त्याच्यावर अश्‍लील शब्दात शेरेबाजी गेल्याचे त्यांना दिसून आले.

हेही वाचा - मुंबईत वर्षभरात अपघातात १७९ जणांनी गमावला प्राण​

त्यानंतर त्या त्वरीत नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली. याप्रकरणी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.  

web title : guy arrested for making obscene comments on actress Facebook

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: guy arrested for making obscene comments on actress Facebook