नराधम शिक्षक अल्पवयीन मुलींवर वर्गातच करत होता लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

घरी सांगितल्यास नापास करीन अशी भीती देखील घालत होता.

टिटवाळा : प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या सहा ते सात अल्पवयीन मुलींवर गेल्या सहा महिन्यापासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार मोहने येथे समोर आला होता. या प्रकरणी संबधित शिक्षकाला अटक करण्यात आली होती. कल्याण न्यायालयाकडून या शिक्षकाला 24 फेब्रुवारी पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

हेही वाचा - बेस्टच्या बस थांब्यावर होणार व्हर्टिकल गार्डन

आरोपी शिक्षकाचे नाव विजय मिटकर असे असून तो मोहने येथील एका प्राथमिक नोकरी करत होता. मागील सहा महिन्यापासून मिटकर इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा ते सात अल्पवयीन मुलींशी अश्‍लील चाळे करत होता. तसेच याबाबत तुम्ही तुमच्या घरच्यांना काही सांगितले तर तुम्हाला मी परिक्षेत नापास करेन अशा प्रकारची धमकी देखील देत होता.

हेही बातमी - लव्ह टॅटू, धोका आणि मग...

आपण परीक्षेत नापास होऊ या भीतीने त्या मुलींनी याबाबत आपल्या घरच्यांना काही सांगितले नाही. परंतु त्रास वाढतच गेल्याने गुरुवारी सकाळी पुन्हा असाच प्रकार घडल्याने अखेर त्रस्त झालेल्या मुलींपैकी एका मुलीने याबाबत आपल्या आईला सांगितले. याबाबत मुलीच्या आईने तात्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी सदर शिक्षकाला गुरूवारी (ता. 20)रात्री अटक करत पोक्‍सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या शिक्षकाला शुक्रवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

web title : teacher got arrested for abusing girl student

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher got arrested for abusing girl student