लॉकडाऊन : केशकर्तनकारांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे, अन्यथा कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020

लॉकडाऊनकाळात केशकर्तनालय सेवा बंद असली, तरी छुप्या पद्धतीने नागरिक नाभिकांना बोलावून दाढी, केस कापून घेत आहेत. लॉकडाऊनदरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरुन नाभिकांनी केशकर्तन केल्यास नाभिक आणि संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिला आहे. 

ठाणे : लॉकडाऊनकाळात केशकर्तनालय सेवा बंद असली, तरी छुप्या पद्धतीने नागरिक नाभिकांना बोलावून दाढी, केस कापून घेत आहेत. लॉकडाऊनदरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरुन नाभिकांनी केशकर्तन केल्यास नाभिक आणि संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिला आहे. यामुळे आता केशकर्तनकारांनीच थोडे गांर्भियाने घेऊन या दिवसांत व्यवसाय बंद ठेवावा. नागरिकांनीही त्यास सहकार्य करावे अन्यथा कायदेशीर कारवाईचे नाभिक हकनाक बळी जातील, असे मत नाभिकांनी व्यक्त केले आहे.

मोठी बातमीउद्धव ठाकरेंना द्यावा लागू शकतो राजीनामा, 172 आमदारांच्या पाठिंब्याने पुन्हा करणार सत्ता स्थापनेचा दावा?

लॉकडाऊनदरम्यान नागरिक घरातच असून वाढते केस, दाढी यामुळे काहींमध्ये अस्वस्थता वाढत आहे. केसांचा अवतार पाहवत नसल्याने मरगळ आली असून उत्साह वाटत नसल्याने काहीजण केस कट करण्यासाठी नाभिकांना घरी बोलावून, काही जण आडोशाचा फायदा घेत केस, दाढी करुन घेत असल्याचे चित्र ग्रामीण-शहरी भागात दिसत आहे. हातावर पोट असल्याने अखेर नाभिकही ग्राहकांच्या ऑफर स्वीकारत आहेत. लॉकडाऊनदरम्यान केंद्र सरकारने दुकाने सशर्थ सुरु ठेवण्यासाठी सवलत दिली असली, तरी ती केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी आहे. इतर सेवेतील दुकानांवरील बंदी कायम आहे. नाभिकांची सलून सुरु करण्याची मागणी सरकारने नाकारली आहे. त्यामुळे संचारबंदीकाळात केशकर्तनालय व्यवसाय सुरु केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणारे नाभिक आणि त्यास बोलावणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिला आहे. त्यामुळे नाभिकांनीच कोरोनाचा धोका लक्षात घेत नागरिकांनी विनंती केली ,तरी तेथे जावू नये, असा सल्ला नाभिक एकमेकांना देत आहेत. कोणाला काही अडचण असल्यास त्यांनी संबंधित विभागातील स्थानिक प्रशासन, सामाजिक दाते यांच्याशी संपर्क साधावा, परंतू जीव धोक्यात घालून व्यवसाय सुरु ठेवू नये, अशी विनंती या संदेशातून करण्यात येत आहे. 

नक्की वाचा : “बरं ते जॅकेट कायमचं उतरलं, की हा ‘लॉकडाउन लूक" आहे ?”

लॉकडाऊनमुळे नाभिकांना समस्या भेडसावत असतील, परंतू इतर व्यावसायिकही याच परिस्थितीला तोंड देत आहेत. आपल्यासारख्या अनेकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून या परिस्थितीत मनस्थिती ढळू न देता लढा दिला पाहीजे. नाभिकांनीच आता गांर्भियाने घेत कायद्याचे उल्लंघन न करता व्यवसाय करणे बंद केला पाहिजे. आम्हीही आमच्यापद्धतीने एकमेकांना जागृत करत आहोत.  
- संतोष राऊत, केशकर्तनकार, ग्लोबल ग्रेस सलून, ठाणे

 

Hairdressers should recognize the seriousness of the situation, otherwise take action


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hairdressers should recognize the seriousness of the situation, otherwise take action