Har Ghar Tiranga : साहेब, आम्ही झेंडा कुठे लावू?

बेघरांचा प्रश्‍न : पालघर जिल्ह्यात १२ हजार कुटुंब घराविना
Har Ghar Tiranga Initiative 12 thousand families are homeless in Palghar
Har Ghar Tiranga Initiative 12 thousand families are homeless in Palghar sakal

मोखाडा, (जि.पालघर) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात यंदा ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनी घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले जात आहे; मात्र पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्यात शासकीय आकडेवारीनुसार आजही सुमारे १२ हजार कुटुंब बेघर आहे. त्यामुळे हे बेघर कुटुंबीय ‘घरच नाही तर झेंडा कुठे लावू’, असा सवाल विचारत आहे. पालघर जिल्हा निर्मितीला आठ वर्षे होऊनही अद्याप स्थानिकांच्या समस्या सुटलेल्या नाही. अनेक भागात साधा रस्ताही नसल्याने रुग्णांना प्रसंगी डोली करून दवाखान्यात नेण्याची वेळ येते. या प्रवासात शेकडो रुग्णांनी जीव गमावले आहेत. उन्हाळ्यात तर येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पुरेसे रोजगार नसल्याने शहराकडे स्थलांतरही होत आहे.

एकीकडे बुलेट ट्रेन, मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग आदी विकासाचे मार्ग निर्माण होत असताना जिल्ह्यात मात्र अद्याप १२ हजार कुटुंबांना हक्काचे घर नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात या बेघर कुटुंबांनी तिरंगा कुठे लावायचा, असा प्रश्न विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या निवडणुकीवेळी २०२२ पर्यंत देशात एकही कुटुंब बेघर राहणार नाही, प्रत्येक कुटुंबाला पक्के घर देणार असल्याची घोषणा केली होती; मात्र पालघर जिल्ह्यात सद्य:स्थितीत सुमारे ११ हजार ७७५ कुटुंब बेघर असल्याची शासन दप्तरी नोंद आहेत. त्यातही अखेरचे अनुदान न मिळाल्याने अनेक घरकुले अपूर्णावस्थेत आहेत. अनेक घरकुले मंजूर झाले नसल्याचेही वास्तव आहे. दरम्यान, जिल्ह्यात १५ ते २० टक्के बेघरांना घरे देण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

पालघर जिल्ह्यातील विविध योजनेंतर्गत मंजूर घरे

९२६१ - पंतप्रधान आवास योजना

१०९ - रमाई आवास योजना

१८७१ - शबरी आवास घरकुल योजना

५३४ - आदिम आवास घरकुल योजना

पालघर जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हजारो कुटुंब बेघर आहेत.त्यांच्यापुढे तिरंगा कुठे फडकवायचा, हा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागात प्राथमिक सुविधा आणि पक्के घरे बांधून देणे आवश्यक आहे.

- वैदेही वाढाण, अध्यक्षा, जिल्हा परिषद, पालघर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com