esakal | कर्ज फेडलं नाही तर 'ते' घरी येऊन बसतात आणि तुमच्या परिवारासोबत...

बोलून बातमी शोधा

कर्ज फेडलं नाही तर 'ते' घरी येऊन बसतात आणि तुमच्या परिवारासोबत... }
  • मुंबईत वसुलीभाईंचं अंडरवर्ल्ड
  • वसुलीभाईंच्या दहशतीमुळे कर्जदार हैराण
  • अनेक कर्जदारांना करावी लागतेय आत्महत्या?
कर्ज फेडलं नाही तर 'ते' घरी येऊन बसतात आणि तुमच्या परिवारासोबत...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अनेकदा आपण अत्यंत महत्त्वाच्या गरजेपोटी कर्ज घेतो. काही अपरिहार्य कारणामुळे एखादा हप्ता थकतो. त्यावेळी मात्र, कर्ज घेण्यासाठी गोड बोलणाऱ्या वित्तसंस्थेचा खरा चेहरा समोर येतो आणि अंडरवर्ल्डप्रमाणे आपल्याकडून वसुली सुरू होते.

PHOTO : पद्मा लक्ष्मीने पुन्हा शेअर केले टॉपलेस फोटो, इंटरनेटवर लावली आग..

तुम्ही एखाद्या खासगी बँकेचं किंवा वित्तसंस्थेचं कर्ज घेतलंय का. कर्ज फेडताना काही अडचणी येतायत का. मग सावधान... तुमच्या मागे वसुलीभाईंचा ससेमिरा लागू शकतो. या वसुलीभाईंमुळे अनेकांचं जगणं मुश्कील झालंय. अनेक बँकांनी त्यांच्या कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी खासगी कंपन्यांना कंत्राटं दिलीत. त्यांनी नेमलेल्या वसुली प्रतिनिधींच्या कर्जवसुलीच्या पद्धती पाहिल्या तर तुम्हाला धक्का बसेल. अगदी अंडरवर्ल्डचे गुंड ज्या प्रमाणे धमक्या देऊन खंडणी उकळतात, त्याच पद्धतीनं कर्जदारांना धमक्या देऊन कर्जवसुली केली जाते.

धक्कादायक : चल वडापाव देतो, चायनिज देतो सांगून तिला घेऊन जायचे आणि..

या प्रतिनिधींकडून अनेकदा धमक्यांचे फोन येतात. शिवीगाळ केली जाते. जाहीरपणे संबंधित व्यक्तीचा अपमान केला जातो. त्यापेक्षाही भयानक पद्धत म्हणजे भल्या सकाळी हा रिकव्हरी एजंट कर्जदाराच्या घरी जाऊन बसतो. घरातल्या कोणाशी एक शब्दही न बोलता तो तब्बल 12 तास घरात बसून असतो..या वसुली एजंटना महिना 10 ते 25 हजार रुपये मिळतात. तर ज्या कंपन्यांकडून हे वसुलीचं काम केलं जातं, त्यांना वसूल केलेल्या कर्जाच्या दीड ते अडीच टक्के रक्कम मिळते.

धक्कादायक  नविन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला गेला, पण मुलीने दरवाजाच उघडला नाही वाचा काय घडलं..

या वसुलीभाईंच्या छळामुळे आपल्यावर आत्महत्येची वेळ आलीय, असा दावा अनेक कर्जदार मंडळी करतायत. वास्तविक कर्जाच्या वसुलीसाठी रिझर्व्ह बँकेनं अनेक नियम ठरवून दिले आहेत. मात्र, त्या नियमांना हे वसुलीभाई केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप केला जातोय.
हल्ली कर्ज देण्यासाठी अनेक वित्तसंस्था हात जोडून उभ्या आहेत. तरीही भविष्यात अशा वसुलीभाईंचा जाच होऊ शकतो. त्यामुळे कर्ज घेताना किमान 10 वेळा विचार करणं उत्तम.