

Nitin Gadkari Faces Resignation Demand As Harshvardhan Sapkal Alleges E20 Fuel Policy Caused Vehicle Problems
sakal
मुंबई : ‘‘पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून कोट्यवधी रुपयांचा लाभ सरकारमध्ये बसलेल्या काही लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना झाला; परंतु त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वाहनांत बिघाड झाले असून, ‘ई-२०’ हा एक मोठा गैरव्यवहार आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा,’’ अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.