Maharashtra Politics : कर्जमाफी मिळणार नाही हे सत्ताधाऱ्यांचे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे : हर्षवर्धन सपकाळ

Political Statement : उल्हासनगरमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जमाफी संदर्भातील विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांची आशा तोडणारे सरकारवर काँग्रेस पक्षाने आरोप केले.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Sakal
Updated on

उल्हासनगर : जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत.विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता 31 मार्चपूर्वी पीककर्ज भरा,कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे,असा संताप व्यक्त करत, ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उल्हासनगरात उपस्थित केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com